नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी महापालिकेची सीबीएसई शाळा सुरू केली आहे. परंतु कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळा क्रमांक ९४ येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आले तरीही आद्यप शिक्षकच मिळाले नाहीत. विद्यार्थ्यांचे शिक्षकांना अभावी शैक्षणिक वर्ष तडजोडींमध्ये गेले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचापुरता बट्ट्याबोळ झाला आहे. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्यास महापालिका कमजोर पडत असल्याचे समोर येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नवी मुंबई : झाडांवर खिळे ठोकून फुकट्या जाहिरातींने झाडांचे नुकसान … कारवाई कागदावरच

आजमितीस बहुतांशी पालक मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमाकडे वळली आहेत. त्यामुळे सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला अधिक पसंती दिली जात आहे. परंतु सर्वच पालकांना या शाळेमध्ये आपल्या मुलांना शिक्षण देणे अवाक्य बाहेरचे आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत गरीब- गरजू विद्यार्थ्यांसाठी सीबीएससी शाळा सुरू केली. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक पुरेसे होते. परंतु दिवसेंदिवस महापालिका सीबीएसई शाळेला भरघोस प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे या शाळांमधील पटसंख्या ही वाढत आहे. महापालिकेने कोपरखैरणे आणि नेरूळ येथे सीबीएसई शाळा सुरू केल्या आहेत. नेरूळ येथील शाळा सुरळीत असून कोपरखैरणे येथील विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र मागे पडले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: नागरी आरोग्य केंद्राअभावी कोपरीतील रहिवाशांना बसतोय आर्थिक भुर्दंड

१२५०विद्यार्थ्यांची मदार अवघ्या १०-१२ शिक्षकांवर आहे. दिवाळीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध होतील असे आश्वासन महापालिकेकडून पालकांना देण्यात आली होती. सहामाही परीक्षा उलटली , आता वार्षिक परीक्षा ही तोंडावर आली असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा अखेरचा टप्पा येऊन ठेवला आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांना अद्याप शिक्षकच मिळेनात? अशी परिस्थिती विद्यार्थ्यांची झाली आहे. मार्च सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील असे, असताना देखील अद्याप केवळ ८०% अभ्यासक्रम शिकवून झाला असून अद्याप २०% अभ्यासक्रम बाकी आहे. हा उर्वरित २०% अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार ?आणि विद्यार्थ्यांकडून अभ्यास कसा करून घेणार? या विवंचनेत विद्यार्थी आणि पालक अडकले आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई महापालिका प्रशासकाच्या कार्यकाळातच पालिका तिजोरीतून सर्वाधिक खर्च !

वर्षभर विद्यार्थ्यांची अवघी ३ तासांची शाळा

कोपरखैरणे येथील महापालिकेच्या सीबीएसई शाळेत विद्यार्थी संख्या जास्त आणि शिक्षकांचे संख्या बळ अपुरे पडत आहे. विद्यार्थी जास्त आणि शिक्षक कमी असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला कसे शिकवायचे या अनुषंगाने ही शाळा दोन सत्रात तीन- तीन तासांची भरवली जात आहे. ८ शिक्षक १७ तुकड्या हाताळत असल्याने १ वर्गाला केवळ तीन तास शिकविले जात आहे. गेले वर्षभर विद्यार्थ्यांची शाळा अवघ्या तीन तासांची भरत आहे. शाळेचे शैक्षणिक वर्ष अखेरच्या टप्प्यात असून आता शिक्षक मिळाले नाहीत तर पुढील वर्षी ही पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशीच गत होईल,त्यामुळे पालक येत्या १५ दिवसांत आंदोलनाच्या तयारीत आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There are no teachers in navi mumbai municipal corporation cbse school no 94 koparkhairane dpj