उरण: अंतिम चाचणी पूर्ण झाल्याने मार्ग वाहतुकीला सज्ज असतांनाही उरण ते खारकोपर लोकल उदघाटन अभावी थांबली आहे. यासाठी आतापर्यंत अनेक तारखा आणि मुहूर्त आले आणि सरले तर आठवडाभरावर दिवाळी हा सर्वात मोठा सण आलेला आहे. मात्र या दिवाळीच्या मुहूर्तावरही हा मार्ग सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उरणकरांना पुन्हा एकदा लोकल सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील पंचवीस वर्षांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या नेरुळ ते उरण लोकल मार्गावरील उरण खारकोपर दरम्यानचा दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मार्गावरील लोकल धावणार आहे. उरण ते खारकोपर या मार्गावरील अपूर्ण असलेल्या रेल्वेच्या कामानाही वेग आला आहे. उरणसह येथील सर्व रेल्वे स्थानकात या मार्गावरील विद्युत यंत्रणा तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे स्थानकांच्या परिसरातील कामे ही वेगाने सुरू आहेत. स्थानकांच्या सफाईची कामे सुरू आहेत. येथील सूचना फलक,टाईम बोर्ड आदींची ही तपासणी सुरू आहे. या मार्गावरील नेरुळ ते खारकोपर दरम्यानच्या तरघर तर खारकोपर ते उरण दरम्यानचे गव्हाण स्थानकातील छताचे काम पूर्ण होत आले असून उर्वरित काम फेब्रुवारी २०२४ ला ही कामे पूर्ण होणार आहेत.

हेही वाचा… कोकण भवनवरील नगरपालिका कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे

उरण मधील नागरिकांच्या रेल्वे सेवा सुरू होण्याच्या अनेक सणांच्या वेळी आशा पल्लवीत होतात मात्र त्या वारंवार फोल ठरत आहेत. दरम्यान २६ ऑक्टोबर पूर्वी मध्य रेल्वेच्या उपव्यवस्थापकांनी या मार्गाची अंतिम पाहणी केली आहे. परंतु उदघाटनाचा मुहूर्त सापडत नसल्याने उरणच्या नागरिकांना वाट पाहण्याशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही.