नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिवाळीच्या अनुषंगाने जादा भाडे आकारणी करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उरगला आहे. अवघ्या २० दिवसांत ३५६ वाहनांची तपासणी करण्यात आली . यापैकी अवैध वाहतूक करणाऱ्या ८२ खासगी बसवर कारवाई करून १ लाखाहुन अधिक दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु या कारवाई दरम्यान सर्वाधिक ५९ बसमध्ये अग्निशमन यंत्रणाच कार्यरत नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >>>रस्त्यावर वाहन उभे करतायं… सावधान! डिझेल चोरांचा पनवेलमध्ये धुमाकूळ

fire company Pimpri-Chinchwad, fire Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
capacity of 200 e-bus charging stations in the ST fleet will also increase in one year
एसटीच्या ताफ्यात वर्षभरात २०० ई-बस चार्जिंग स्टेशनची क्षमताही वाढणार
mumbai fire brigade
मुंबई : अग्निशमन दलाच्या ताफ्यात ६८ मीटर उंच शिडी वाहने दाखल होणार
A fire broke out on Shilpata road.
शिळफाटा रस्त्यावर नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसला आग, वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नामुळे २२ प्रवासी सुरक्षित, बस खाक
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
massive fire broke out in scrapped bus belonging to municipalitys transport service in Nalasopara East
नालासोपाऱ्यात परिवहन सेवेच्या भंगार बसला आग, तिसऱ्यांदा आग दुर्घटना
Fast paced concreting on Madh Marve road in Malad is causing traffic congection
मढ मार्वे मार्गावरील रस्ते कामात नियोजनाचा अभाव, वाहतूक कोंडीमुळे पाऊण तासाच्या प्रवासासाठी अडीच तास प्रतीक्षा

काही दिवसांपूर्वी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर खासगी बसला लागल्या आगीमुळे खासगी बस वाहतूक आणि परिणामी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई आरटीओ ने ही अवैध, नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दिवाळी सणानिमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. याच गर्दीचा फायदा घेत खासगी बस चालक प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारणी करून आर्थिक लूट करीत असतात. त्यावर वचक ठेवण्यासाठी आरटीओने ९ ऑक्टोबर पासून कारवाईचा धडका सुरू केला आहे. मात्र या कारवाईदरम्यान सर्वाधिक वाहनांमध्ये अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन खिडकी सुस्थितीत सुरू नसल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारे खाजगी बस मधून नियमांचे पालन न करता प्रवासी वाहतूक केली जात आहे. एखादी अपघाताची घटना घडल्यास अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याने मोठी हानी होत आहे. त्यामुळे अशा नियमबाह्य खाजगी बस वर कारवाई होणे गरजेचे आहे.आरटीओ विभागाकडून वर्षभर अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते .ऑक्टोबर मध्ये दिवाळीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून २०दिवसांत ८२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामधे वाहन योग्यता, अग्निशमन यंत्रणा, अपघातकालीन व्यवस्था कार्यरत नसलेल्याचे समोर आले आहे. – हेमांगी पाटील , उपप्रादेशिक अधिकारी , आरटीओ

हेही वाचा >>>चाळीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करंजा-रेवस बंदर रस्ते मार्गाने जोडणार

वाहन प्रकार
अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसलेले ५९
आपत्कालीन दरवाजा नसणे ४
विनापरवाना १२
अवैध माल वाहतूक १५
योग्यता प्रमाणापत्र ६
इंडिकेटर, रिफ्लेक्टर नसलेले वाहन ३
विना कर १
जादा भाडे आकारणी २
एकूण ८२

Story img Loader