वाढती सायबर गुन्हेगारी पाहता मुंबईच्या धर्तीवर नवी मुंबईत दोन सायबर पोलीस ठाणे निर्मितीचा घेतलेल्या निर्णयबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. त्यात नव्याने रुजू झालेल्या आयुक्तांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेल उघडला जाणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे सायबर पोलीस ठाण्याचे काय झाले हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई पोलिसांनी जप्त केला ६१ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा; दोन टेम्पोही ताब्यात

मानवी जीवनात आद्योगिक क्रांती नंतर सायबर क्रांतीने मोठे बदल घडवून आणले. मात्र त्यासोबत गुन्हेगारीनेही आपले स्वरूप बदलले असून पारंपारिक मार्ग सोडून थेट सायबर हल्ला करीत पैसे कमावत आहेत. या गुन्हेगारीचा विळखा दिवसेंदिवस आवळला जात असून त्यासाठी सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यास वेगळ्या सायबर पोलीस ठाण्याची गरज भासू लागली. त्यात नवी मुंबईतही सायबर गुन्हेगारीचा चढता आलेख पाहता या शहरात दोन सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दोन्ही परिमंडळ मध्ये प्रत्येकी एक पोलीस ठाणे निर्माण करण्याच्या हालचाली सुरु होत्या. अशी माहिती १५ जून २०२२ मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांनी दिली होती. मुंबईचे जोड शहर असल्याने हि पोलीस ठाणे लवकरच प्रत्यक्षात उतरतील अशी अपेक्षा केवळ नागरिक नव्हे तर पोलीस वर्तुळातही होती.ो

हेही वाचा- नवी मुंबई : महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी सहाय्यक आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या

मात्र प्रत्यक्षात अद्याप त्या पोलीस ठाणे साठी जागेची पाहणीही करण्यात आली नाही. त्यात नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक सायबर कक्ष सुरु करणार असल्याची घोषणा दिली. पोलीस विभागात कुशल सायबर तज्ञ नसल्याने खाजगी तज्ञांची मदत घेतली जाते. या द्वारे केवळ समाज माध्यमातून बदनामी, छेडछाड असे सायबर तज्ञ नसलेल्या व्यक्ती करून करण्यात आलेल्या गुन्ह्यांची उकल केली जाते. फार झाले बोलण्यात गुंगवून एटीएम कार्ड बदल करून पैसे हडप करणाऱ्या दोन चार टोळ्या पकडल्या गेल्या आहेत. या पेक्षा जास्त नाही.

हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसी अग्नी अहवाल गुलदस्त्यात?

सायबर गुन्हेगारीत सेक्सटाँर्शन हा नवा प्रकार आला असून यात एखाद्या मध्यमवयीन वा जेष्ठ नागरीलाच्या लैंगिक भावना चाळवत नको ते करावयास लावले जाते आणि नंतर ब्लँक मेलिंग करत  शुटींग समाज माध्यमात पसरवण्याचे भय दाखवून पैशांची मागणी केली जाते खारघर येथील एका जेष्ठ नागरिकाचे अशाच प्रकारे तब्बल ६७ लाख रुपयांची फसवणूक झालेली आहेशिवाय लॉटरी, विविध कारणांनी ओटीपी मागून पैसे लांबवणे, विद्युत देयक भरले नाही सांगत मोबाईल अँनीडेस्क टिम व्हीवर्स आदी प्रणालीतून होणारी फसवणूक हि खूप मोठी आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही गुन्ह्यांची उकल वा आरोपीला अद्याप करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलेले नाही. गेल्या काही वर्षात खाजगी कार्यालयात हि सायबर हल्ला (हँक), रेडीओ फिक्वेन्सी वर हल्ला करून १४ सर्वर खराब करण्यात आले होते, त्याचाही उलगडा नाही.२५ मार्च २०२२ हा प्रकार समोर आला, चाईल्ड पोर्नग्राफी सारखे हिडीस प्रकारहि नवी मुंबईत घडले असून या बाबतजून २०२२ मध्ये  NCMEC ( The National Centre for missing and Exploitad Children) यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी दिलेल्या माहिती वरून दिवाळकर नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या शिवाय ऑन लाईन फसवणूक, कर्ज ओटीपी घेत पैसे काढून घेणे आदी प्रकार तर नित्याचीच बाब झाली आहे.

हेही वाचा- वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून अश्लील मेसेज पाठवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

अमित काळे (उपायुक्त गुन्हे शाखा) आपण प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर कक्ष निर्माण करणार आहोत तर त्याची पुढची पायरी म्हणजे गुन्हे तपास अर्थात अँनालिसेस हा पोलीस आयुक्तालयातून केला जाणार आहे. हि व्यवस्था वेगवान गतीने काम करण्यातही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.