चोरी करताना केवळ रोकड वा चीजवस्तूच नाही तर काहीही कामाच्या नसलेलेल्याही वस्तू चोरी होण्याचे प्रकार नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून घडत आहेत. यात चोरट्यांना अशा वस्तूंचा काहीही फायदा होत नाही मात्र ज्याच्या कडे चोरी झाली त्याला मनस्तापाला सामोरे जावे लागते.
नवी मुंबईत गेल्या काही दिवसात झालेल्या चोरी प्रकरणात चोरट्यांनी रोकड दागिने चोरी केलेच आहेत शिवाय त्यांना काहीही उपयोग नसलेल्या वस्तूंचीही चोरी केली आहे. विनोद भाटीया यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांचे कार्यालय एपीएमसी मध्ये आहे. ते नेहमी प्रमाणे २ तारखेला कार्यालय बंद करून घरी गेले दुसर्या दिवशी कार्यालयात चोरी झाल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी त्यांना दिली. त्यांनी कार्यालयात जाऊन पहिले असता त्यांच्या खोलीतील कपटाचे कुलुप तोडून आतील तीन लाख ८५ हजाराची रोकड चोरी झाल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे चोरट्यांनी सोबत त्यांच्या एका ट्रकचे आरसी बुक आणि ज्या कपाटाचे कुलूप तोडले त्याची कपाटात ठेवलेली किल्लीही चोरी केल्याचे निदर्शनास आले. या बाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रार्थमिक तपासणीत कार्यालयातील शौचालयाच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले.
या चोरीत चोरट्यांनी ३ लाख ८५ हजाराची रोकड शिवाय ट्रकचे आरसी बुक, ज्या कपटाचे कुलूप तोडले त्याचीच आत ठेवलेली किल्लीही नेली. रोकड व्यतिरिक्त वस्तूंचा चोरट्यांना काहीही फायदा नाही मात्र ज्याच्या कडे चोरी झाली त्याला नवीन आरसीबुक काढणे नवीन कुलूप किल्ली बनवून घ्यावे लागणार आहेत. यापूर्वीही वाशीतील चोरीत चोरट्यांनी बँकेतील लॉकरच्या किल्ल्या चोरी केल्या तर सीबीडी येथील दोन घरात चोरी करताना रोकड व दागिण्या व्यतिरिक्त उची मद्य चोरले या व्यतिरिक्त याच मद्याच्या रिकाम्या बाटल्याही सोबत घेऊन गेले होते.शिवाय घरात घेतलेल्या काही वस्तूंची देयके हि चोरी केले होते.