नवीन पनवेलमधील अश्वमेध सोसायटीसमोर पोलीस असल्याची बतावणी करुन जेष्ठ नागरिकाला गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तीन आरोपींपैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून ५० हजार रुपयांची सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे. अली जाफरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आलं.

हेही वाचा- लवकरच नवी मुंबईकरांना मिळणार डबल डेकरची सफर ! एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत डबल डेकर बस दाखल

विचुंबे येथे राहणारे सेवानिवृत्त शरद कांबळे हे जेष्ठ नागरीक पायी जात असताना त्यांना २५ ते ३५ वयोगटातील त्रिकुटाने थांबवले. या त्रिकुटाने कांबळे यांना ते साध्या वेशातील पोलीस असल्याची बतावणी केली. पोलीसांची तपासणी सूरु असल्याचा धाक दाखविला. कांबळे यांना त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागीने काढून कागदात बांधून ठेवायला सांगीतले. या दरम्यान हातचलाखीने कांबळे यांची सोन्याची चेन एका भामट्याने स्वत: कडे ठेवली. तर दुस-याने सोन्याची अंगठी ठेवली. हा सर्व प्रकार होत असताना याच रस्त्यावरुन जाणा-या इतर नागरिकांना या भामट्यांचा संशय आला. नागरिक एकामागोमाग एक येथे जमा होऊ लागल्यानंतर रिक्षातून दोन भामटे कांबळे यांची १० हजार रुपये किमतीची अंगठी घेऊन पसार झाले. तर नागरिकांनी एका भामट्याला पकडले.

हेही वाचा- नवी मुंबई शहरातील इलेक्ट्रीक चार्जिंग स्थानक नावापुरते….

या भामट्याने नागरिकांच्या तावडीतून सुटण्यासाठी स्वत:चा श्वास कोंडला असून गुदमरल्याचे नाटक करु लागला. जागरुक नागरिकांनी खांदेश्वर पोलीस ठाण्याला संपर्क साधला. अखेर पोलीस व नागरिकांनी या भामट्याला पोलीसांच्या स्वाधिन केले. या संपुर्ण घटनेत जेष्ठ नागरिक कांबळे यांची ५० हजार रुपयांची सोनसाखळी त्या भामट्याकडे सापडली. अली जाफरी असे या भामट्याचे नाव असून अली याला पोलीसांनी फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. फसवणूकीसाठी अलीसोबत आलेले इतर दोघे भामटे मुंब्रा येथील रहिवाशी आहेत. या त्रिकुटाने यापूर्वी पनवेल परिसरात किती गुन्हे केलेत याची माहिती पोलीस अलीकडून घेत आहेत.

Story img Loader