सीबीडी सेक्टर नऊ येथे समोरासमोर असणाऱ्या दोन घरात चोरी करून चोरट्यांनी एक लाख १३ हजाराचा ऐवज चोरी केला. त्यात एकाच्या बँक लॉकरची किल्लीही पळवली.सीबीडी येथे राहणाऱ्या दोन शेजार्यांच्या घरात चोरी झाली असून दोन्ही कडे राहणारे हे जेष्ठ नागरिक आहेत. यातील फिर्यादी ७१ वर्षीय उषा नयार या सीबीडी सेक्टर ९ १३ वी गल्ली घर क्रमांक २ मध्ये राहतात.त्यांच्या पतीच्या निधनानंतर एकट्याच राहतात. १४ ओगस्टला ते आपल्या एका नातेवाईकाच्या कडे हैद्राबाद येथे गेल्या. तर त्यांचे शेजारी रामदास अव्दर ५ सप्टेंबरला केरळ येथे गेले होते. २१ तारखेला त्यांना त्यांचे अजून एक शेजारी व्यंकट गंधने प्रभात फेरी मारत असताना त्यांना उषा आणि रामदास या दोघांच्या घरांच्या खिडकीची सुरक्षा जाळी (ग्रील) तुटलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे त्यांनी उषा यांना या बाबत कल्पना देताच त्याही तातडीने नवी मुंबईत आल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा