नवी मुंबई: कारची मागची काच फोडून चोरट्यांनी वाहनातील नऊ लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार नेरुळ येथे घडला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
ही घटना गुरुवारी संध्याकाळी सव्वासहा ते साडे सहाच्या दरम्यान घडली. विनोद शाही यांनी आपली कार सेक्टर चार येथील रसोई रेस्टॉरण्ट अँड बारच्या समोर उभी केली होती.
हेही वाचा… ठाण्यातही विशेष मुलांसाठी उपचार केंद्र सुरू होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
काही वेळाने काम संपवून ते कारकडे आले, त्यावेळी कारची मागील काच फुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वाहनातील सामानाची तपासणी केली असता मागील आसनावर ठेवलेली बॅगे आढळून आली नाही. या बॅगेत त्यांनी ९ लाखांची रोकड, कस्टम पास ओळखपत्र होते.