नवी मुंबई : टोमॅटोचे उत्पादन कमी असल्याने टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो १०० इतर किरकोळ बाजारात दीडशे पार केले आहे. त्यामुळे टोमॅटोला पेट्रोल पेक्षाही जास्त दर असल्याने टोमॅटो चांगलेच भाव खात आहेत. एपीएमसीत चोरट्यांनी महागलेल्या टोमॅटोवर डल्ला मारला असून ७०-७५ किलोचे ७ हजार रुपयांचे टोमॅटो चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. टोमॅटो चोरतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
सध्या बाजारात उसळलेल्या दराने टोमॅटो चांगलेच भाव खात आहे. टोमॅटो हे दररोज लागणारे जिन्नस असल्याने कितीही महाग झाले तरी टोमॅटो घ्यावेच लागते. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये टोमॅटो अगदी कवडीमोल दराने विक्री होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे दुर्लक्ष केले परिणामी सध्या टोमॅटोचे उत्पादन कमी असल्याने टोमॅटोची टंचाई भासत आहे. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सध्या टोमॅटो चांगलेच भाव खात आहेत. टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असल्याने आता टोमॅटो चोरीच्या घटना घडत आहेत. एपीएमसी बाजारात शनिवारी रात्रीच्या सुमारास भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्याच्या गाळ्यावर चोरट्यांनी डल्ला मारून तब्बल ७०-७५किलोचे, सात हजार रुपयांचे टोमॅटो चोरल्याची घटना समोर आली आहे. टोमॅटोची इतकी दर वाढ झाली आहे की, आता टोमॅटो देखील चोरीला जात असल्याचे प्रकार समोर येत आहे.