उरण : गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आला असल्याने प्रसिद्ध पेणच्या बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. या वर्षी बंदी असलेल्या बैलगाडा शर्यती सुरू झाल्याने मूर्तिकारांकडे बैलगाडीवर आरूढ झालेल्या गौरी-गणपतींच्या मूर्तींना अधिक मागणी असल्याचे येथील मूर्तिकारांनी सांगितले.
ओडिशा, रायपूर, मेरठ, कोल्हापूर, डोंबिवली, पुणे येथून आशा मूर्तिकारांसाठी मागणी असल्याचे वैभव ठाकूर या मूर्तिकाराने सांगितले. याबरोबरच पेशवाई गणपती, विठ्ठलाच्या रूपातील गणपती, राधा-कृष्ण, सोन्याचे दागिने परिधान केलेला दगडूशेठ गणपती, आगरी-कोळी वेशातील गणपतीच्या मूर्तींना मागणी असल्याने या मूर्ती सध्या येथील कारखान्यांत बनवण्यावर भर देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पेण हे गणपती मूर्तिकारांचे जागतिक माहेरघर मानले जात असून तालुक्यात सुमारे एक हजारपेक्षा अधिक गणपती कारखाने आहेत. एक फुटापासून १० ते १२ फुटांच्या मूर्ती येथे घडवल्या जातात.
विविध रूपांतील आकर्षक मूर्ती येथील कारखानदार बनवत असल्याने परदेशांतूनही येथील मूर्तींना मागणी असते. गेली दोन वर्षे निर्बंधांमुळे मूर्तिकारांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता निर्बंध शिथिल झाल्याने लहान आकाराच्या मूर्तींपासून मोठ्या आकाराच्या मूर्तींनाही मागणी असल्याने मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे.

पेण तालुक्यातील तांबडशेत येथील कारखानदार वैभव ठाकूर यांनी सांगितले की, नुकतीच बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठविल्यामुळे यंदा बैलगाडीवर विराजमान गणपती आणि गौरीच्या मूर्तींना विशेष मागणी आहे. यामध्ये डोंबिवली येथील बैलगाडी शर्यतप्रेमी यांच्यासह ओडिशा, रायपूर, कर्नाटक, हैदराबाद, कोल्हापूर येथून अशा मूर्तींना मागणी आहे. आतापर्यंत २० मूर्तींची नोंदणी झाली आहे.
सुबक व आकर्षक मूर्ती

सुमारे अडीच ते तीन फूट लांबीची बैलगाडी तयार करण्यात येत असून पैठणी साडी, शाही फेटा, नथ आणि सोन्याचे दागिने घातलेली गौरीची लोभस मूर्ती तयार करण्यात येत आहेत. तसेच हिरेजडित दागिने आणि पेशवाई फेटा घातलेल्या गणपतीची सुबक आकर्षक मूर्ती या बैलगाडीवर आरूढ असणार आहे.