नवी मुंबई : महाराष्ट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्यावतीने एचएससी अर्थात बारावीचा निकाल जाहिर झाला असून नवी मुंबईचा निकाल ८९.५७ टक्के इतका लागला आहे. नवी मुंबई शहरातून ६३ शाळांच्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली असून एकूण १५ हजार ८२३ परीक्षार्थींची नोंद झाली होती. मागील वर्षी ३२ शाळा होत्या तर यंदा अवघ्या ११ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
करोनाच्या निर्बंधात शिथिलता आल्यानंतर यंदा १०० टक्के क्षमतेसह विद्यार्थी १२ वीच्या परीक्षेला सामोरे गेले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निकाला बाबत हुरहुरी बसली होती. नवी मुंबईतील शंभर टक्के शाळांच्या निकालात यंदा मात्र घसरण झाल्याचे पहायवास मिळत आहे. काही नामवंत शाळांच्या निकालात देखील घसरण झाल्याचे निकालानंतर पहावयास मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शंभर टक्के शाळांची परंपरा निम्यावर आली आहे. मागील वर्षी ३२ शाळांचा निकाल १००% लागला होता तर यंदा अवघ्या ११ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : नालेसफाईची मुदत संपूनही सफाई अपूर्ण
या शाळांचा शंभर टक्के निकाल
फादर अँगनेल मल्टीपर्पस स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशी यांच्या विज्ञान आणि वाणिज्य विभाग, भारती विद्यापीठ प्रशाला आणि जुनियर कॉलेज, ज्ञानपुष्प विद्यानिकेतन या शाळेच्या वाणिज्य विभाग, सेंट मेरिस मल्टीपर्पज हायस्कूल व जुनियर कॉलेज, एस. एस.हायस्कुल व जुनिअर कॉलेज नेरूळ सेक्टर १४ च्या कला व वाणिज्य विभाग, क्रिस्ट अकॅडमी कोपरखैरणे सेक्टर १३ आणि साधू वासवानी ज्युनियर कॉलेज वाणिज्य विभाग, एम.ई.एस ज्युनियर कॉलेज बेलापूर, सीक्रेट हार्ट हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कला व वाणिज्य विभाग, फादर अँड आयटीआय कॉलेज वाशी, श्रीमती राधिकाबाई मेघे कनिष्ठ महाविद्यालय ऐरोली या शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.