उरण : जैवविविधतेने नटलेल्या व पक्षी निरीक्षणाचे ठिकाण असलेल्या उरणमध्ये हजारोंच्या संख्येने परदेशी पक्षी येऊ लागले आहेत. मात्र येथील पाणथळी वर मातीचा भराव करून बुजविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने उरणच्या अनेक पाणथळी कोरडया झाल्या आहेत. परिणामी अनेक पक्षी आता नव्या पाणथळींच्या शोधत आहेत. सध्या फ्लेमिंगोंनी उरण रेल्वे स्थानक आणि शेवा गावाच्या परिसरातील पाणथळींवर आपला मोर्चा वळविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरणच्या सर्वात मोठ्या पाणजे येथील वादग्रस्त २८९ हेक्टर पाणथळ परिसरात येणारे आंतरभरती पाण्याचे प्रवाह बंद करण्यात आल्याने ही पाणथळ कोरडी झाली आहे. पर्यावरणवाद्यांनी यासंदर्भात पर्यावरण विभागाकडे तक्रार करण्यात आलेली आहे. परदेशी स्थलांतरित पक्षी येण्याचा हा काळ आहे. त्यामुळे पाणथळी कोरड्या झाल्याने पक्षी संख्या घटण्याची शक्यता आहे. नुकसानीची शहानिशा करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याबद्दल पर्यावरवादी कार्यकर्त्यांनी खेद व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जैवविविधता निर्देशांकात भारत १८० देशांपैकी १७६ व्या क्रमांकावर आहे. उरण मधील जेएनपीए बंदर परिसर पाणजे,भेंडखळ आणि बेलपाडा येथील पाणथळी कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे या परिसरात येणारे पक्षी त्यांचे खाणे आणि पाणी असलेल्या नव्या ठिकाणांच्या शोधात आहेत. उरण रेल्वे स्थानक आणि नवीन शेवा गाव यांच्या मध्ये एक पाणथळ आहे. येथे फ्लेमिंगो दर्शन होत असल्याची माहिती तेलिपाडा येथील नागरिक अशोक म्हात्रे यांनी दिली आहे.

उरण मधील जेएनपीए बंदर परिसर पाणजे,भेंडखळ आणि बेलपाडा येथील पाणथळी कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे या परिसरात येणारे पक्षी त्यांचे खाणे आणि पाणी असलेल्या नव्या ठिकाणांच्या शोधात आहेत.

उरणमध्ये ३० स्थलांतरित पक्ष्यांसह किमान ५० प्रजातींचे पक्षी आकर्षित करणारी पाणजे पाणथळ आता आंतरभरतीच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा आणल्यामुळे कमी-अधिक प्रमाणात मृत पावत आहेत. खरेतर, आंतरभरतीयुक्त ओलसर जमीन पुरल्यामुळे गावांमध्ये आधीच अवेळी पूर येत आहेत, त्यामुळे सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन पाणजे पाणथळ जमिनीचे संवर्धन करावे. बी. एन. कुमार. संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousands of foreign birds arrived in uran with flamingos moving to nearby water bodies sud 02