संतोष जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई राज्यभरात अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून वर्षानुवर्ष शाळांच्या टोलेजंग इमारती उभ्या राहून हजारो विद्यार्थी नवी मुंबई महापालिकाक्षेत्रातील ५ इंग्रजी शाळा अनधिकृतअसल्याची यादी नवी मुंबई महापालिकेने जाहीर केली असून त्यात इंग्रजी माद्यमाच्या ५ अनधिकृत शाळा असून अनधिकृत शाळांबाबत पालिका फक्त यादी जाहीर करण्यापुरतीच आहे का असा सवाल उपस्थित झाला असून या अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या भवितव्याचा विचार करुन तात्काळ शाळा बंद करण्याची कारवाई करण्याची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात येत आहे.
नवी मुंबई महपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली असून यंदा नवी मुंबई शहरात ५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे शहरातील पाचही शाळा इंग्रजी माध्यमाच्याच आहेत. शिक्षणक्षेत्रात सध्या इंग्रजी माध्यमाच्या सीबीएसई तसेच आयसीएसई शाळांचे पेव वाढत असून पालकही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्याचा हट्ट करत असताना त्या शाळा अधिकृत आहेत का याची खबरदारी पालकांनी घेणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे अनधिकृत शाळांना परवानगी नसताना महापालिका क्षेत्रात या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिकतात कसे हा प्रश्न असून पालिकेच्या दुर्लक्षपणामुळे व पालिकेने तात्काळ कारवाई न केल्यामुळे पालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. बेलापूर येथील इस्माइल एज्युकेशन ट्रस्टची अल मोमीन स्कुल, आर्टिस्ट व्हिलेज, ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टची नेरुळ मधील इकरा ईस्लामिक स्कुल ॲण्ड मक्तब, द आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे द ऑर्किड इंटरनॅशनल स्कुल (सीबीएसई), सीवूड, सेक्टर-४०, ज्ञानदिप शिक्षण प्रसारक मंडळ, किसननगर नं. ३, ठाणेचे सरस्वती विद्यानिकेतन स्कुल, सेक्टर -५, घणसोली (न्यायप्रविष्ठ प्रकरण), इलिम फुल गोस्पेल ट्रस्टचे इलिम इंग्लिश स्कुल, आंबेडकर नगर, रबाळे या शाळा अनधिकृत आहेत. परंतू या शाळांमध्ये संंस्थांच्या माध्यमातून अनधिकृतपणे शाळा चालवल्या जात असताना पालिकेने मात्र तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पालिकेने यादी जाहीर केल्यानंतर ,संबंधित शाळांना नोटीस बजावणे तसेच त्यानंतर दंडात्मक कारवाई करणे व दंड वसूल करणे व संबंधित शाळांवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने व शिक्षण विभागाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. शहरात सुरु असलेल्या शाळा या नव्यानेच सुरु झाल्या नसून काही शाळांच्यातर टोलेजंग इमारती असून या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाचा ढिसाळपणा जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>वाशीत महाराष्ट्र भवन लवकरच उभं राहणार – आमदार म्हात्रे 

शहरातील अशा अनधिकृूत शाळांमध्ये शाळेच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज केला आहे. आम्हाला परवानगी मिळणार आहे असे सांगून प्रवेश दिले जातात .परंतू पुढे जाून याच शाळांना परवानगी नसल्याने मुलांना दहावीच्या बोर्ड परीक्षांना बसवताना अडचणी येतात. त्यामुळे पालिकेने अशा अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात येत आहे.भविष्यात अशा शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याला पालिकाही तितकीच जबाबदार असणार आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई : दिघा रेल्वे स्थानक सुरू करा; मनसेचे जोरदार आंदोलन

राज्यभरात अनधिकृत शाळा सुरु होतात त्याला त्या त्या ठिकाणी असलेल्या प्रशासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. प्रशासकीय अधिकारीच याला जबाबदार असून तात्काळ अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. वर्षानुवर्ष शाळा सुरु असताना प्रशासकीय यंत्रणा काय करतात हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे अनधिकृत शाळांवर व त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करायला हवेत. अनधिकृत इंग्रजी व सीबीएसई शाळा वर्षानुवर्ष सुरु असताना दुसरीकडे मराठी शाळांना मात्र मान्यता नाकारली जाते हे महाराष्ट्रातले दुर्दैव आहे.- सुशिल शेजुळे, समन्वयक, मराठी शाळा संस्थाचालक संघ, महाराष्ट्र

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून नियमानुसार संबंधित शाळांना नोटीस बजावणे ,दंडात्मक कारवाई करणे व संस्थावर गुन्हे दाखल करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. –अरुणा यादव ,शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका