लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उरण: तालुक्यातील फुंडे,डोंगरी व पाणजे या तीन गावांना जोडणाऱ्या मार्गावर चिखलमय धोकादायक खड्डे पडले आहेत. या निसरड्या मार्गावरून येथील विद्यार्थ्यांना ही प्रवास करावा लागत असल्याने धोका निर्माण झाला आहे. तर याच मार्गावरील २०२१ मध्ये कोसळल्या खाडी पुलाच्या दुरुस्तीची नागरिकांना मागील दोन वर्षांपासून प्रतीक्षा आहे.
सिडकोने लवकरात लवकर हा खाडी दुरुस्ती करून मूळ मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. उरण शहर व जेएनपीटीसारख्या आंतराष्ट्रीय बंदरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर वसलेल्या फुंडे, डोंगरी व पाणजे या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील फुंडे रस्त्यातील खाडीपूल एप्रिल २०२१ मध्ये अचानक कोसळला. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या डाऊर नगर येथील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या गावांना जाण्यासाठी बंद झालेल्या जुन्या उरण ते शेवा मार्गाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली.
आणखी वाचा-खांदेश्वर वसाहतीमधील अर्धाफूट खड्ड्यात वाहने आपटून प्रवास
मात्र या मार्गाने प्रवासी वाहनांबरोबरच डम्परसारख्या जड वाहनांची वाहतूक सुरू झाली. त्यामुळे या मार्गाला प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये पावसाळ्याची भर पडल्याने दीड ते दोन फुटांचे चिखलाने भरलेले धोकादायक खड्डे मार्गातून येथील नागरिक प्रवास करीत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी वाहने आणि नागरिकांनाही प्रवास करावा लागत आहे. या खड्डयांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे फुंडे, डोंगरी व पाणजे या तीन गावांना जोडणाऱ्या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी डोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र घरत यांनी केली आहे.
आणखी वाचा- वाहतूक पोलिसांच्या मदतीने रिक्षात विसरलेली बॅग अवघ्या वीस मिनिटात मिळाली परत…
कांदळवनामुळे वाट बिकट
सिडकोच्या अखत्यारीत येणाऱ्या फुंडे गावाजवळील कोसळलेल्या खाडी पुलाच्या दुरुस्तीसाठी कांदळवनाचा अडथळा निर्माण झाला आहे. मागील दोन वर्षांपासून पूल दुरुस्तीच्या परवानगी साठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. कांदळवनामुळे उरण मधील गावांना जोडणाऱ्या या पारंपरिक रस्त्यांच्या दुरुस्तीचा खोळंबा होऊ लागला आहे. याचा फटका हजारो नागरिकांना बसत आहे. एकीकडे मोठं मोठ्या प्रकल्पाना जलदगतीने परवानग्या मिळत असतांना नागरिकांच्या रहदारीच्या मार्गाच्या दुरुस्तीत अडथळा येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.