तळोजा येथे बनावट दारूचा अड्डा उद्ध्वस्त
दोन कोंबडी व्यापाऱ्यांचे अपहरण करणाऱ्या तीन जणांना नवी मुंबई पोलिसांनी तीन तासांत बेडय़ा ठोकल्या. तर बनावट दारू बनवणाऱ्यांची टोळी उद्ध्वस्त केली.
पनवेलमधील रफिक शेख आणि यासिक पटेल या दोन कोंबडी व्यापाऱ्यांचे चार लाखांच्या मागणीसाठी सलिम शेख, उदय देशपांडे आणि शाहरुख मुलतानी यांनी बुधवारी अपहरण केले आणि त्यांना कर्जत येथील शेतातील घरात कोंडून ठेवून त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेची तक्रार तळोजा पोलिसांत दिल्यानंतर उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. अन्य एका घटनेत बनावट दारू बनविणाऱ्या दोघांना साडेपाच लाख रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. तळोजा नोडमधील हिना अपार्टमेंटमध्ये हा बनावट दारूचा व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी वालजी नारंग लावरीया आणि रमेश मेघजी मनोदरा या दोघांना अटक केली. हे मूळचे गुजरात राज्यातील आहेत. छापा टाकल्यानंतर महागडय़ा दारूच्या बाटल्या भरलेल्या सापडल्या. चौकशीनंतर उल्हासनगर आणि मुंबई येथून बाटल्या आणि बूच मिळवून त्यामध्ये बनावट दारू भरलेली होती.०

Story img Loader