पनवेल: पनवेल बस आगाराच्या परिसरात तीन बांगलादेशी नागरिकांना पनवेल शहर पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ताब्यात घेतले आहे. या तिघांची नावे अली हाफीज शेख, रबीवुल मनन शेख, मेसन किसलू मुल्ला अशी आहेत. हे तिघेही काही महिन्यांपासून नवी मुंबईतील दरावे गावात राहत होते. या तिघांनीही बांगलादेश आणि भारत सिमेवरुन घुसखोरी करुन ते विना पारपत्र नवी मुंबईत राहत होते.
बांगलादेशातील नोडाईल जिल्ह्यातील जामवीर पडोली या गावातील हे तिघेही मूळ राहणारे आहेत. पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना लवकरच कायदेशीर कार्यवाहीनंतर त्यांच्या मूळगावी पाठविणार आहेत.
हेही वाचा… बेकायदा नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम; पाणीपुरवठा विभागाची आज बैठक
या प्रकरणात अजून काही बांगलादेशी नागरिक नवी मुंबईत राहतात का याची चौकशी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचे पथक करत आहे.