नवी मुंबईतील कोपरखैरणे नोड येथे एका मैदानात युवकाचा मृतदेह आढळून होता. त्याच्या हत्येचा तपास केला असता धक्कादायक प्रकार समोर आला यात तीन अल्पवयीन आरोपी असून एक आरोपी वीस वर्षीय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोपरखैरणे सेक्टर२३ येथील भूमिपुत्र मैदानात साहिल शांताराम गोळे (वय १७) याचा मृतदेह आढळून आला होता. सुरवातीला त्याच्या डोक्यात दगड घालून ठार केल्याचे समोर आले मात्र वैद्यकीय तपासणीत त्याला अगोदर भोकसण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास करताना तांत्रिक तपासाची व खबऱ्यांची मदत घेण्यात आली त्यात एका सतरा वर्षीय मयत युवकांच्या मित्रावर संशयाची सुई सरकली पोलिसांनी त्याला शोधून काढले त्याने पोलिसांना दिलेल्या माहिती वरून अन्य तीन आरोपींना पकडण्यात आले या मध्ये सनी पवार या वीस वर्षीय  आरोपीला अटक करण्यात आली तर तीन अल्पवयीन आरोपींची रवानगी सुधारगृहात करण्यात आली.

आरोपी पैकी एका अल्पवयीन युवकाचे आणि मयत युवकाचे काही वाद होते या बाबत बोलण्यासाठी मयत युवकाला मंगळवारी रात्री सेक्टर२३च्या भूमिपुत्र मैदानात बोलावण्यात आले त्या ठिकाणी सोबत आणलेल्या चाकूने त्याला भोसकूल खाली पडले व जवळच पडलेला मोठा दगड त्याच्या डोक्यात टाकून हत्या करण्यात आली .अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तीदार यांनी दिली.