पनवेल : पनवेल महापालिका प्रशासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी’ ही योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवून त्या योजनेत पात्र महिलांची नोंदणी करण्यासाठी यापूर्वी २० मदतकक्ष पालिकेच्या विविध कार्यालयांत प्रभागस्तरावर सुरु केले आहेत. परंतु बुधवारपासून पालिकेने मोबाईल व्हॅनमधून तीन फिरते मदत कक्ष सुरु केले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या घराजवळ योजनेत नाव नोंदणी करता येईल. आत्तापर्यंत पालिका क्षेत्रात पाच हजारांहून अधिक महिलांनी योजनेसाठी अर्ज भरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिका क्षेत्रातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना या योजनेंतर्गत अर्ज भरता यावे यासाठी महापालिकेच्यावतीने एक पाऊल पुढे टाकत लाभार्थ्यांच्या दारी जाण्यासाठी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून तीन फिरते मदत कक्ष सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी घेतला. ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेंतर्गत महिला अर्ज भरू शकतील. महापालिका क्षेत्रातील जास्तीतजास्त पात्र लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त चितळे यांनी केले आहे.

हेही वाचा – पनवेलमधील सराफाने साडेसहा कोटींना फसवले

या मोबाईल व्हॅनमधील फिरत्या मदतकक्षात २ लिपिक टंकलेखक, १ महिला बचत गटमधील महिला आणि १ अंगणवाडी सेविका अर्ज भरण्यासाठी मदत करणार आहे. हे फिरते मदत कक्ष पनवेल हद्दीतील, सिडको हद्दीतील वीस आदिवासी पाडे, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन ऑफलाइन ऑनलाइन फॉर्म भरणार आहेत.

हेही वाचा – Uran Assembly Constituency : जयंत पाटलांच्या पराभवामुळे उरणचा पेच

या योजनेत पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात डीबीटीद्वारे दरमहा दीड हजार इतकी रक्कम सरकार देणार आहे. पालिकेचे उपायुक्त संतोष वारूळे यांच्या मार्गदर्शनाखाली २० ठिकाणी मदत कक्षातून कामकाज सुरु आहे. या मदतकक्षात अंगणवाडी, आशा सेविका, डेएनयुएलएम अंतर्गत बचत गटाच्या महिला, डाटा एन्ट्री ऑपरेटर, मदतनीस, शिपाई, सुरक्षा अधिकारी पालिकेने उपलब्ध करून दिले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three mobile help desks of panvel mnc for ladaki bahine yojana ssb