इंदोर येथे झालेल्या राष्ट्रीय खेल स्पर्धेत उरण येथील जलतरणपटूंनी दमदार कामगिरी करीत नऊ सुवर्ण पदक पटकावले आहेत. यामध्ये आर्यन मोडखरकर याने जलतरण स्पर्धेत तीन सुवर्ण पदक मिळविण्याचा बहुमान मिळविला आहे.
हेही वाचा- रुग्णालय व मेडिकलसाठी सवलतीच्या दरात भूखंड द्या; नगरविकास विभागाचे सिडकोला आदेश
आर्यन मोडखरकरची चमकदार कामगिरी
१७ ते १९ सप्टेंबर दरम्यान मध्यप्रदेशातील इंदोर येथे झालेल्या संयुक्त भारतीय खेल फाउंडेशनच्या ७ व्या राष्ट्रीय खेल स्पर्धेत उरण येथील हितेश भोईर, आर्यन मोडखरकर आणि जयदीप सिंग यांनी जलतरण स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये, उरण येथील १६ वर्षीय आर्यन मोडखरकर याने चमकदार कामगिरी करीत एक उत्तम जलतरणपटू म्हणून यश मिळविले आहे. त्यातच, गेल्या दोन वर्षात आर्यनने अनेक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविली आहेत नुकताच उरण येथे झालेल्या जलतरण स्पर्धेतही त्याने तीन सुवर्ण पदक मिळविली आहेत.
हेह वाचा- ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’; शिंदे गटाची जोरदार दसरा मेळावा तयारी
तीन प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई
दरम्यान, इंदोर येथील गोल्डन इंटरनॅशनल स्कूलच्या जलतरण तलावामध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत वर्चस्व मिळविले आहे. यामध्ये, हितेश भोईर याने ५० मी फ्रिस्टाईल, १०० मी फ्रिस्टाईल आणि १०० मी बॅक्स्ट्रोक या प्रकारांमध्ये तीन सुवर्ण पदक मिळवली असून, तर जयदीप सिंग याने ५० मी फ्रिस्टाईल, ५० मी ब्रेस्टस्ट्रोक, १०० मी ब्रेस्टस्ट्रोक या तीन प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
तर, आर्यन याने जलतरण स्पर्धेतील फ्रिस्टाईल आणि बटरफ्लाय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये, आर्यनने ५० मीटर फ्रिस्टाईल, ५० मीटर बटरफ्लाय आणि १०० मीटर फ्रिस्टाईल या स्पर्धामध्ये सुवर्ण पदक पटकाविण्याचा बहुमान मिळविला आहे.
हेही वाचा- ५० फूट उंच माड झाडावर अडकलेल्या मांजरीच्या पिल्लाची सुटका; प्राणीमित्रांच्या प्रयत्नांना यश
इंदोर स्पर्धेत उरणच्या जलतरणपटूंचे वर्चस्व
इंदोर येथील राष्ट्रीय खेल स्पर्धेमध्ये उरणच्या या तीन जलतरणपटूंनी वर्चस्व मिळवत नऊ सुवर्ण पदकांची लयलूट केली आहे. उरणच्या या तिन्ही स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या या कामगिरीमुळे उरणचे नाव हे राष्ट्रीय स्पर्धेत उंचावले आहे.