नवी मुंबई: मंगळवारी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. देवी विसर्जन दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी सकाळी सात ते बुधवारी सकाळी सात पर्यंत जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये रस्त्यांवर होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी मंगळवार (दिनांक २४/१०/२०२३) सकाळी ०७.०० वाजल्यापासून ते बुधवार (दिनांक २५/१०/२०२३) सकाळी ०७.०० वाजेपर्यंत नवी मुंबई कार्यक्षेत्रातून बृहन्मुंबईच्या व ठाणे हद्यीत जाणा-या तसेच बृहन्मुंबईच्या व ठाणे हद्यीतून नवी मुंबईत प्रवेश करणा-या सर्व जड व अवजड वाहनांना प्रवेश करण्यास निर्बंध घालून तशी अधिसूचना निर्गमीत करण्यात आली आहे.
सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, प्रवासी वाहतुक करणा-या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.