नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भाजीपाल्यामध्ये टोमॅटोच्या दराने उसळी घेतली होती. परंतु हळूहळू टोमॅटोचे दर आवाक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. वाशी मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात राज्यातील टोमॅटो आवक वाढली असून दरात १२ -१४ रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊकमध्ये टोमॅटो २४-२८ रुपयांनी विक्री होत आहेत. एपीएमसी बाजारात सध्या राज्यातील टोमॅटो दाखल होत असून सातारा, विटा, सोलापूर, सासवड येथून २८ गाड्या आवक झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : नवी मुंबईत अतिक्रमणांचे इमले, शहरात ७ हजारांपेक्षा अधिक बेकायदा बांधकामे?

यंदा टोमॅटोला कवडीमोल दर मिळाला होता. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांनी टोमॅटो लागवडीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे दरम्यानच्या कालावधीत राज्यात मागणीच्या तुलनेने दराने उच्चांक गाठला होता. आता बाजारात राज्यातील टोमॅटो आवक वाढत आहे, त्यामुळे दरात घसरण झाली आहे. गुरुवारी बाजारात १२३७ क्विंटल टोमॅटो दाखल झाले आहेत. त्यामुळे आधी बाजारात प्रतिकिलो ३८-४० रुपयांनी विकले जाणारे टोमॅटोचे दर कमी झाले असून २४-२८ रुपयांवर आले आहेत, अशी माहिती व्यापारी रामदास कदम यांनी दिली आहे. किरकोळ बाजारात ५० रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत आहे.