नवी मुंबई: मागील दोन महिन्यांपासून बाजार गाजवणाऱ्या टोमॅटोचे गडगडले असून सोमवारी वाशी एपीएमसी बाजारात प्रतिकिलो ५-१०रुपयांवर घसरले आहेत. पंरतु दिवसेंदिवस टोमॅटोच्या दरात घसरण होत असल्याने उत्पादनाचा खर्च ही निघत नाही, त्यामुळे शेतकरी मात्र पुरते हवालदिल झाले आहेत.

टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्यानंतर केंद्र सरकारने नेपाळवरून १० टन टोमॅटोची आयात करण्याचा करार केला. त्यानुसार टप्याटप्याने टोमॅटो आयात सुरु झाली. परंतू त्यामुळे सध्या टोमॅटोचे दर चांगलेच गडगडले आहेत. जुलै- ऑगस्टमध्ये टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. बाजारात अवघे १५-२०गाड्या दाखल होत होत्या. त्यामुळे किरकोळ बाजारात २००तर घाऊक बाजारात ही १५०रुपयांनी विक्री होत होते.परंतु ऑगस्ट अखेर पासून टोमॅटो आवक वाढली असून त्यात केंद्र सरकारने टोमॅटो आयात केली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत टोमॅटो आवक अधिक असल्याने दर एकदम कोसळले आहेत.

सोन्याच्या दरात चारच तासात बदल… अर्थसंकल्पांतर पुन्हा…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महायुती सरकारने तीन लाख ७० हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Soybean Rate : महायुतीचे सोयाबीन खरेदीचे दावे, तरीही शेतकरी संकटातच; काय आहे कारण?
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
सतीश आळेकर यांना ‘जनस्थान’; १० मार्च रोजी नाशिकमध्ये पुरस्काराने गौरव
union agriculture minister shivraj singh chauhan on soybean rate
सोयाबीनला कमी दर मिळाला; केंद्रीय कृषिमंत्र्यांची कबुली, जाणून घ्या, पुढील आश्वासन काय
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
Macquarie predicts a 44% drop in Zomato’s share price.
Zomato चा शेअर ४४ टक्क्यांनी पडणार? ब्रोकरेज फर्म म्हणाली, “क्विक-कॉमर्समध्ये झोमॅटो…”

हेही वाचा… ट्रॅव्हल पोर्टलच्या मदतीने कोट्यवधींचे आमिष दाखवत २ कोटी ८९ लाखांची फसवणूक

मागील आठवड्यात एपीएमसी बाजारात प्रतिकिलो १२-१४ रुपयांनी विक्री होणारे टोमॅटो सोमवारी मात्र ५-१०रुपयांनी विक्री झाले आहेत तर शेतकऱ्यांना ३-५रुपये दर मिळत आहे. अचानकपणे टोमॅटोच्या दरात घसरण होत असून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातुन अधिक टोमॅटो आवक होत असून सोमवारी एपीएमसीत ४३ गाड्या दाखल झाल्या असून १९७७ क्विंटल आवक झाली आहे. घाऊक मध्ये प्रतिकिलो ५-१०रुपये तर किरकोळ बाजारात २०रुपयांनी विक्री होत आहेत.

‘टोमॅटो लागवडीचा खर्च ही निघेना’

शेतकऱ्यांना टोमॅटो लागवड , खत, काढणी इत्यादी उत्पादनासाठी प्रति एकर दीड ते दोन लाख रुपये खर्च होत आहे. महिनाभरापूर्वी दीड ते दोन हजार रुपये क्रेटने विकला गेलेला टोमॅटो आता ८०-९० रुपये क्रेटने विक्री होत आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना प्रति एकर केवळ ९०हजार ते १लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. वाशी एपीएमसी बाजारात १०रुपये दराने टोमॅटो विक्री होत असला तरी शेतकऱ्यांना प्रतिकिलो वाहतूक, हमाल, तोलाई इत्यादी ५ रुपये खर्च होऊन केवळ ३-५रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापले असून प्रतिक्रेट ३००रुपये तरी दर मिळावेत असे मत शेतकरी अर्जुन खराडे यांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader