नवी मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच बाजार समिती मधून निर्यातशुल्क वाढीचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्याच बरोबर आज नाशिक येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आद्यप तरी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत बंदचा परिणाम दिसत नसला तरी येथील व्यापारी संघ बंदला पाठींबा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नादुरुस्त फुंडे मार्गाची दुरुस्ती; फुंडे, डोंगरी, पाणजेतील ग्रामस्थांना दिलासा

कांदा निर्यातशुल्क लादल्याच्या निषेधार्थ व्यापारी संघटना आक्रमक झाले आहेत. नाशिक बाजार समितीत आज कांद्याचा लिलाव बंद ठेवण्यात आला होता. मात्र सध्या तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत परिणाम झाला नसला तरी येथील व्यापारी संघटना बंदच्या तयारीत आहेत. याबाबत आज दुपारी ३ वाजता कांदा बटाटा बाजारात व्यापारी संघाची बैठक होणार असून नाशिक व्यापारी संघटनेला पाठींबा देण्यासाठी  कांदा बटाटा बाजार बंदबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती व्यापारी अशोक वाळुंज यांनी दिली आहे. केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढविल्याने त्याचा थेट कांदा निर्यातीवर परिणाम होणार असून परदेशात कांद्याची निर्यात कमी होईल,परिणामी राज्यात कांद्याचे दर घसरतील त्यामुळे बाजार समितीमधील सर्वच व्यापारी संघटनाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी वाशी एपीएमसी बाजारात १३१गाड्या दाखल झाल्या असून प्रतिकिलो दरात २-३रुपयांनी घसरण झाली आहे. सोमवारी घाऊक बाजारात प्रतिकिलो कांदे १७-२२रुपयांनी विक्री झाला आहे.