राज्यातील मोठ्या बाजार समित्या ई नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) पोर्टलवर जोडण्याचा निर्णय पणन विभागातर्फे घेण्यात आला होता . मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नामचे कामकाज सुरू आहे, असा दावा पणन विभागाने केला आहे. राज्यातील तसेच वाशीतील एपीएमसी बाजार समितीत ही योजना लागू करण्यासाठी व्यापाऱ्यांकरिता ऑनलाइन प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. परंतू त्या प्रशिक्षणाला व्यापाऱ्यांनी अनुपस्थिती दर्शवली आहे. ई- नाम योजनेला व्यापाऱ्यांमधून विरोध होत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: शालेय विदयार्थ्यांनी केली आदिवासी मुलांची दिवाळी गोड

एपीएमसी प्रशासन ही योजना लागू करू पाहत आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी विशेषतः भाजीपाला व फळ आणि कांदा बटाटा बाजारात होणे कठीण आहे. अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांमधूम उमटत आहे. एपीएमसी बाजारात पाच ही बाजार समित्यांमध्ये जवळ जवळ १० हजार व्यापारी आहेत. भाजीपाला व फळे ही जीवनावश्यक व नाशवंत माल असल्याने त्याची विक्री ही लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. कमी वेळेत शेतमालाची वर्गवारी, गुणवत्ता तपासणी कशी शक्य होणार आहे? त्यांनतर मालाची विक्री कशी होणार आहे. भाजीपाला व फळ हे दिर्घ काळ टिकणारा माल नसल्याने ही योजना या बाजारात फोल ठरेल.

हेही वाचा- नवी मुंबई: ३० वर्षांपासून रखडलेला नाल्यावरील पुल अखेर मार्गी लागणार

ई नाम म्हणजे एकप्रकारे शेतमालाची ऑनलाइन विक्री करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. परंतु एपीएमसीत बाजाराची व्याप्ती मोठी असून ऑनलाइन विक्रीसाठी केवळ शेतमालाचा दर्जा, दराबाबत विचारणा होते. परंतु प्रत्यक्षात विक्री होत नाही. तेच बाजार समितीत खरेदीसाठी आलेले ग्राहक स्वतः मालाची प्रतवारी पाहून खरेदी केली जाते. त्यामुळे ऑनलाइन ही सुविधा वेळखाऊ आहे. ई नाम योजनेला व्यापाऱ्यांचा विरोध असून या ऑनलाइन प्रशिक्षणाकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. ई नाम योजनेची अंमलबजावणी व्यापाऱ्यांवर न लादता एपीएमसीने स्वतः करावी अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे.

Story img Loader