नवी मुंबई आणि मुंबईला जोडलेल्या उरण तालुक्याच्या औद्योगिक विकास वाढल्याने होळी आणि शिमग्याच्या परंपरा आणि शिमग्यातील खेळ जागेच्या अभावामुळे अस्ताला जाऊ लागले आहेत. उरण हा कोकणातील एक भाग आहे. त्यामुळे कोकणातील अनेक होळी आणि शिमग्यातील प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू होत्या.भारतीय समाज हा अत्यंत उत्सव प्रिय आहे. येथील बारा महिने हे कोणत्यातरी उत्सवाचेच असतात. भारतात सर्वत्र साजरा होणारा होळी हा सण म्हणजे एक लोकोत्सवच आहे. महाराष्ट्रात विशेषता ग्रामीण भागात होळीकोत्सव साजरा करण्याची मोठी परंपरा आहे. या प्रदीर्घ परंपरेला शिमगा किंवा होळी म्हणतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नवी मुंबई: महिला आयपीएल मुळे वाहतुकीत बदल

उरण तालुक्यात हा होळीकोत्सव जोरदारपणे साजरा केला जातो. होळीचे आजचे स्वरूप बदलले असले तरी येथील काही जुन्या परंपरा अजून कायम टिकून आहेत. प्रत्येक गावागावात वाडीवस्तीत होळीचा सण साजरा केला जातो. होळीकोत्सवाची जुनी परंपरा कायम असताना, या परंपरेनुसार शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत होळीचे मुख्य पुजारी सावर जातीच्या झाडाची एक लहान फांदी आणून ती होळीच्या खांबावर म्हणजे होळीच्या मैदानात संध्याकाळी उभी करून त्या फांदीची हळद कुंकुनी पूजा करून त्यावर पेंढा टाकून बोंबा मारून फांदी पेटवून देण्याची प्रथा होती. पण ही प्रथा आज दिसून येत नाही. शुद्ध नवमीपासून ते पौर्णिमेपर्यंत दर दिवस संध्याकाळी हा उपक्रम केला जात होता. होळीला प्रदक्षिणा घालून, अश्लील शब्द उच्चारुन, बोंब ठोकून होळी पेटविण्याचे काम ते करत असत. आजही पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. होळीच्या आठवडाभर आदी अनेक गावातून आट्यापट्या,कबड्डी,खो सारखे खेळ तरुण खेळत असत. तर लाच लहानगी मुलं मोठ्यांचा पेहराव करून होळी जवळ खेळ खेळत असत. त्याचप्रमाणे होळी लावण्यासाठी लागणार लाकूड फाटा हा गावातील नागरीकरणाच्या घरा घरात जाऊन गोळा केला जात होता. त्यासाठी तरुण एक मिरवणूक काढून ढोल तशा आणि रिकामे डबे वाजवीत प्रत्येकाच्या दारात जाऊन ऐ का बयन घेतल्या शिवाय जायन,हे घर बांधलंय माझ्या जीवावर आशा बढाया व धमक्या खुले पण यावेळी देऊन मिळेल ते लाकूड फाटा जमा केला जात होता. तर धुलीवंदनाच्या दिवशी अनेक प्रकारची सोंग घेऊन शिमगा मागण्याचीही ही परंपरा होती. यासर्व प्रथा आणि परंपरा बंद झाल्या आहेत. त्यामुळे शिंमग्याच्या सणातील उत्साह ही कमी झाला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional customs and games of holi and shimga uran amy