पनवेल: शीव पनवेल महामार्गावरील खड्यांमुळे बेलापूर खिंडी जवळील उड्डाणपुलाची ओळख कोंडीचा मार्ग अशी होत आहे. सोमवारी सकाळी या वाहतूक कोंडीतील वाहन रांगा तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत पोहचली होती. पावसाळ्यापूर्वी खड्यांची दुरुस्ती करुनही या महामार्गावर खड्डे पडणे हे नित्याचे झाल्याने वाहतूक पोलीसांची डोकेदुखी वाढली आहे. वर्षानुवर्षे खड्डे बुजविण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केला जातो. परंतू कायमस्वरुपी उपाययोजनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शीव पनवेल महामार्गावर दोन्ही बाजूंना खड्यांचे साम्राज्य आहे. हे खड्डे बुजविल्यावर ठराविक ठिकाणी नेहमी पडतात. हे खड्डे डागडुजी केल्यानंतर का पडतात याविषयीचे अभिप्राय वाहतूक अभियांत्रिकी विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागातील तज्ज्ञांकडून घेणे आवश्यक झाले आहे. पनवेल शीव महामार्गावर बेलापूर खिंडीत उरण फाट्याकडे जाणा-या पुलापूर्वी आणि पुलावर तसेच जुईनगर रेल्वेस्थानकासमोर, शीव पनवेल महामार्गावर वाशी येथील उड्डाणपुल उतरताना गोकूळ थांब्याजवळ, नेरुळच्या उड्डाणपुलावर चढावाच्या ठिकाणी तसेच जेथे कॉंक्रीट आणि डांबरी रस्ते एकत्र होतात त्या पट्यांवर खड्डे कायमस्वरुपी असतात.

हेही वाचा… उरणमधील जलसेवा सहाव्या दिवशीही बंद, हवामान विभागाचा धोक्याचा इशारा कायम

वेळोवेळी हे खड्डे तात्पुरते बुजविल्यानंतर सुद्धा त्याच ठिकाणी खड्डे पडतात. बेलापूर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक उत्तर जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनूसार बेलापूर खिंडीत बेलापूरहून उरण येथे जाणारे वाहनांना चढणीवर वळसा मारायला लागत असल्याने पावसाळ्यात या महामार्गावीर डांबरावर वाहनांची चाके फिरतात. त्यामुळे वाहनांची गती कमी होऊन डांबर निघते. त्यामुळे खड्डे पडतात. तसेच पावसाळी पाण्याचा निचरा कमी होत असल्याने महामार्गाचे त्या पल्याचे कॉंक्रीटीकऱण झाल्यास यावर कायमस्वरुपी पर्याय निघेल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगदाळे यांनी दिली.

हेही वाचा… कोपरखैरणे पोलिसांनी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत ३ सराईत आरोपींना केले जेरबंद, ७ गुन्हे उकल, पाणी मीटर चोरही अटकेत 

पोलीसांनी कॉंक्रीटीकरणाचा पर्याय सूचविला असला तरी मुंबई पूणे द्रुतगती महामार्ग कॉंक्रीटीकरण असताना त्यावरही खड्यांची समस्या कायम आहे. शेकडो कोटी रुपये कॉंक्रीटीकरण झालेल्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी खर्च केले जातात. अशीच स्थिती उरण जेएनपीटी बंदराकडे पनवेल शीव महामार्गावुन जाणारी अवजड वाहनांमुळे खड्डे पडत आहे. क्षमतेपेक्षा दुप्पट वजनाची वाहतूक सध्या महामार्गांवर सूरु आहे. अवजड वाहनांनी डांबरी किंवा कॉंक्रीटच्या महामार्गांवर ब्रेक मारल्यास त्याठिकाणी मोठे खड्डे पडतात. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिका-यांची जबाबदारी अवजड वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याची आहे. मात्र ती होत नसल्याने महामार्ग खड्डे आणि अपघात, वाहतूक कोंडी ही समस्या कायम आहे.