नवी मुंबईत आयपीएल सामने होणार आहेत. त्या अगोदर शीव-पनवेल मार्गावर पावसाळ्यापूर्वीची कामे रखडली असून, बेलापूर खिंड उड्डाणपुलाचे काम सिमेंट काँक्रीटीकरण अर्धवट राहिले आहे. सध्या खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आल्याने उरण फाटा परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

ऐन पावसाळ्यातही शीव पनवेल मार्गावरील बेलापूर (खिंड) उड्डाणपुला वरील खड्ड्यांचे काम रखडले होते. आयपीएल सामने असल्याने पूर्ण दुरुस्ती ऐवजी तात्पुरत्या डागडुजीवर भर दिला जातोय. दोन दिवसांपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम करत असताना नियोजनाच्या अभावी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मंगळवारीही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला झालेली मिळाली.

हेही वाचा : नवी मुंबई: कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी ‘या’ तारखेला शिवसेनेचा मोर्चा

सध्या उरण फाटा येथे खड्डे भरणीचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा ५ किलोमीटर असलेल्या खारघर उड्डाणपुलापर्यंत लागल्या आहेत. हे काम अजून काही दिवस चालणार अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र याविषयी मुख्य अभियंता यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. या विषयी अधिक माहिती देताना वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी सांगितले की ,सकाळी- सकाळी बाहेर गावाहून येणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात असतात. त्यातच रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.