थर्टी फस्टच्या काळातील वाहतूक नियोजन बंदोबस्ताचे नियोजन

सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरात परवानाधारक हॉटेल, बार, पब चालक व्यावसायिंकांनी तयारी सुरु केली असून यावर्षी शासनाच्या गृह विभागाच्या पत्रानुसार यावर्षीचा नववर्षाचा जल्लोष पहाटे ५ वाजेपर्यंत असणार आहे. तर दुसरीकडे पोलीस रात्रभर कर्तव्यावर असणार आहेत. शहरातील वाहतूकीबाबातचे नियोजन अंतिम टप्प्यात असून चेकींग पॉईंट, संख्याबळ,नाकाबंदी याबाबत नियोजन करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, महापालिका सतर्क

Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा

करोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत करोना प्रादुर्भावामुळे सर्वच उत्सवावर विरजन पडले होचे. परंतू सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत निर्बंधाविना असल्यामुळे यंदाचा थर्टी फर्स्ट जोशात व उत्साहाने साजरा केला जाणार असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई वाहतूक पोलीसांच्या परिसरात मोठा विभाग येत असून यंदा निर्बंधाविना जल्लोष होणार असल्याने वाहतूक विभाग व नवी मुंबई पोलीस यांच्या नियोजनातून पोलीस बंदोबस्ताची चोख व्यवस्था करण्यात येत आहे.तर या काळात मोठ्या प्रमाणात नववर्षाच्या स्वागताचा उत्सव होणार असून मद्यधुंद अवस्थेतील धुंद झालेल्यांना नियंत्रणात व व नियमावलीचा दणका देण्यासाठी वाहतूक पोलीस विभाग सज्ज झाला आहे.नवी मुंबई शहरात सर्वच विभागात कोणतीही वाहतूक कोंडी होणार नाही याबाबत नियोजन करण्यात येत आहे.वाहतुकीला कोठेही अडथळा होणार नाही यासाठी वाहतूक पोलीसांच्या विविध ठिकाणी पोलीसांना सूचना देण्यात आल्या आहेत.नवी मुंबई शहरातूनच लोणावळा, पुणे व विविध पर्यटनस्थळी जाण्यासाठी नवी मुंबई शहरातून जाणाऱ्या महामार्गाचा उपयोग होत असल्याने या ठिकाणी अधिकचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे..त्यामुळे आतापासूनच वाहतूक पोलीस विभागाने नियोजन व कार्यवाहीला सुरवात केली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : खवय्यांच्या थर्टीफस्ट बेताने मांसाहार वधारला; मासळीत प्रतिकिलो ३००-४०० रुपयांनी वाढ

नागरीक हो याचे भान ठेवा.

नवीन वर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप देताना नागरीक घराबाहेर पडून नववर्षाचा जल्लोष होईल.परंतू नागरीक नववर्षाच्या आगमनाची मजा घेताना प्रत्यक्ष वाहतूक विभाग व बंदोबस्तावर असेले पोलीस हे मात्र आपल्या कर्तव्यासाठी रस्त्यावर पहारा देतील.

करोनाच्या काळात नववर्षाच्या उत्साहावर निर्बंधाचे सावट होते.परंतू  यंदा शासनाने जाहीर केल्याप्रमाणे या नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषासाठी पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. त्यामुळे  वाहतूक विभागाने आवश्यक मनुष्यबळ, शहरातील नाकाबंदीची ठिकाणे तसेच चेकींग पॉईंट यांची ठिकाणे निश्चित करण्यात येत असून कोठेही अडचण निर्माण होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. लवकरच शहरातील चोख व्यवस्थेबाबतही नागरीकांना अवगत करण्यात येईल

तिरुपती काकडे, उपायुक्त वाहतूक विभाग  नवी मुंबई