नवी मुंबई : गणेशोत्सव काळात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशी निमित्त होणारे गणेश विसर्जन सुरळीत पार पडावेत यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केले आहेत. याशिवाय अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ईद ए मिलाद निमित्त निघणाऱ्या जुलूससाठीही वाहतूक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात सर्वाधिक गर्दी वाशी विसर्जन तलावावर होते. त्या अनुषंगाने वाशी वाहतूक शाखेच्या हददीत कोपरखैरणेकडुन ब्ल्यू डायमंड चौकातून शबरी हॉटेल, वाशी से. नं. ९ व से. नं. १६ मार्केट मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणाऱ्या सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी घोषित करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याला पर्यायी मार्ग ब्ल्यू डायमंड चौकातून कोपरी सिग्नल, पाम बीचवरून ऑरेंजा सर्कल मार्गे वाहनांना इच्छित स्थळी जाता येईल. वाशी प्लाझा सिग्नलकडुन छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे ब्ल्यू डायमंड चौकाकडे येणाऱ्या सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी घोषित करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग वाशी प्लाझा चौकातून पामबीचवरून महात्मा फुले भवन चौक व ऑरेंजा सर्कल मार्गे कोपरी सिग्नलवरून डाव्या बाजूस वळण घेऊन ब्ल्यु डायमंड चौकातून उजवीकडे वळण घेऊन इच्छीत स्थळी जातील. ऑरेंजा सर्कल, टायटन शो रुम मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नुर मस्जिद, बोहरा मस्जिद मार्गे, एमटीएनएल चौक, जागृतेश्वर तलावाकडे येणाऱ्या सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी घोषित करण्यात येत आहे.

हेही वाचा : अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओची करडी नजर; एका दिवसात तब्बल १४ वाहनांवर कारवाई

विभागनिहाय रस्ते बंद आणि पर्यायी मार्ग

कोपरखैरणे : संगम डेअरी, स्मशानभूमी (शंकर मंदीर) खाडी किनान्या लगताचा रस्ता सेक्टर १९ ते वरिष्ठा चौक सेक्टर २० कोपरखैरणे कडे जाणान्या गणेश विसर्जन मिरवणूकीतील वाहनांखेरील इतर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून त्यांना पर्यायी मार्ग म्हणून जिमी टॉवर्स चौक येथून उजवीकडे वळण घेवून भिमाशंकर टॉवर्स सेक्टर १९, कोपरखैरणे येथून कल्पेश मेडिकल मार्ग इच्छित स्थळी जातील.

तुर्भे चिंचोली तलाव रोडवर सानपाडा मार्गे माणिकराव बंडोबा पाळकर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवेश बंदी करण्यात येत आहे. याला पर्यायी मार्ग चिंचोली तलाव रोडवर सानपाडाकडून येणारी वाहने गावदेवी चौक जुईनगर येथे वळवून उजव्या भारत गृह निर्माण सोसायटी, जुई सोसायटी मार्गे, सुखशांती नर्सरी येथून इलेक्ट्रिक टॉवर चौकाकडून इच्छित स्थळी जातील. चिंचोली तलाव रोडवर सानपाडा मार्गे माणिकराव बडोबा पाळकर मार्गे गावदेवी चौक जुईनगर सानपाडाकडे येणारे मार्गावर प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

हेही वाचा : शासकीय योजनेत सिडकोची आर्थिक फसवणूक; तब्बल ७९ लाख ४९ हजाराची

पर्यायी मार्ग : इलेक्ट्रीक टॉवर चौक येथे डाव्या बाजूस वळून सुख शांती नर्सरी मार्गे, जुई सोसायटी, भारत गृहनिर्माण सोसायटी येथील गावदेवी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. शिरवणे भुयारी मार्गाकडून चिंचोली तलावाकडे येणारी वाहतुक प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याला पर्यायी मार्ग म्हणून शिरवणे भुयारी गणेश मंदीर येथून परत शिरवणे मार्केट चौकातुन राजीव गांधी ब्रिज खालून डावीकडे वळून छत्रपती शिवाजी चौकातून राजीव गांधी उड्डाणपुलावरून समाधान चौकातून उजवीकडे वळून माणिकराव बडोबा पाळकर चौक मार्गे इच्छित स्थळी वाहनांना जाता येईल.

सीबीडी पोलीस ठाणे, नवी मुंबई अंतर्गत येणारे कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते दक्षिणेस सेक्टर १५ कडे जाणारा रोड व सेक्टर १५ कडुन उड्डाणपुलावरुन कर्मवीर भाऊराव पाटील चौकाकडे येणारा रस्ता हा गणेशमुर्तीची वाहने सोडून इतर सर्व वाहनांना रस्ता बंद ठेवणे बाबत गणेश विसर्जना निमित्त वाहतुक नियमनाकरीता प्रवेश बंदी असेल. पर्यायी मार्ग : दिवाळे जंक्शन ते भाऊराव पाटील रस्ता रेल्वे स्टेशन सेक्टर ११ मार्गे इच्छीत स्थळी जातील.

हेही वाचा : गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ‘नैना’तील खासगी १७१ घरांची सोडत, १० ते २४ लाखांमध्ये सदनिका मिळण्याची संधी

कळंबोली : करवली चौक, सेक्टर २ केएल २ नाका सेक्टर २ हिंदुस्थान बँक चौक, सेक्टर-८- एस.बी. आय. बँक कॉर्नर सेक्टर ८- कारमेल चौक, सेक्टर सनशाईन सोसायटी सेक्टर -1 ६- राजकमल सोसायटी, सेक्टर १० रोडपाली तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर विसर्जन वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांना मार्ग प्रवेश बंदी असणार आहे. पर्यायी मार्ग : सेक्टर ३ कळंबोलीकडुन येणारे वाहनांना सनशाईन सोसायटी उजवीकडे वळुन – कारमेल चौक – गुरुद्वारा चौक, सेक्टर ११ पामविहार सोसायटी सेक्टर १५ डावीकडे – वळुन सेक्टर १७, सेक्टर २० कडून इच्छित स्थळी जाता येईल.

हेही वाचा : मुंबईतील मंडळांना विसर्जनासाठी वाशीत बंदी; वाहतूक कोंडी तसेच विसर्जनाच्या भाराचे कारण

सनशाईन सोसायटी सेक्टर-राजकमल सोसायटी, सेक्टर १० रोडपाली तलाव सेक्टर – -१२- स्मशानभुमी सेक्टर १२ महाराष्ट्र स्कूल सेक्टर १४ हा मार्ग नो पार्किंग करून फक्त गणेश मुर्ती असणाऱ्या वाहनांकरीता व अत्यावश्यक वाहनांकरीता करणे आवश्यक आहे. इतर वाहनांना सदर मार्गावर प्रवेश बंदी करणे आवश्यक आहे. पर्यायी मार्ग – रोडपाली सेक्टर १७, सेक्टर २० कडुन प्लॅटिनम बिल्डींग – इच्छितस्थळी जातील. वाहतुकीतील हे बदल २० सप्टेंबर, २३ सप्टेंबर, २४ सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशी अर्थात २८ सप्टेंबर रोजीच दुपारी बारा ते रात्री बारापर्यंत असणार आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic routes changes in navi mumbai for ganeshotsav 2023 ganesh visarjan css