वाहनचालकांची गैरसोय; पथदिवेही बंद
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
खड्डे, नित्याच्याच वाहनकोंडीमुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवाशांचे हाल होत असताना आता येथील दिशादर्शक फलकही झाडांआड दडले आहेत. त्यामुळे बाहेरून आलेले वाहनचालक गोंधळून जात आहेत. त्यातच रात्री सेवा रस्त्यावर पथदिव्यांअभावी अंधार पडत असून वाहनांच्या हेडलाईटच्या उजेडातच वाहने चालवावी लागत आहेत.
ठाणे-बेलापूर महामार्गालगत तुभ्रेपासून दिघ्यापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी न केल्यामुळे हे फलक आता झाडांआड लपले आहेत. एरव्ही निवासी संकुले आणि उपाहारगृहांबाहेरील झाडांची छाटणी करण्यात तत्परता दाखवणारा उद्यान विभाग महामार्गालगतच्या या झाडांकडे मात्र दुर्लक्ष करत आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर सविता केमिकल व नोसील नाका येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर दररोजच सकाळ व संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अनेक वाहनचालक ठाणे-बेलापुर मार्गाला समांतर असणाऱ्या रस्त्यांचा वापर करतात, मात्र त्यासाठी त्यांना दिशादर्शक फलकच दिसत नाहीत. मुंबई, नवी मुंबईबाहेरून आलेल्या वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
येथील दिशादर्शक फलक व विद्युत रोषणाईची जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिकेची आहे, पण पालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.
तुभ्रेकडून दिघ्याकडे येताना तुभ्रे, वाशी, कोपरखरणे, घणसोली, रबाळे, ऐरोली येथे नागरी वसाहतीकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग व उड्डाणपूल आहेत. वसाहतींचा रस्ता दाखवणारे दिशादर्शक फलक आहेत, मात्र अनेक फलकांवरची नावे पुसट झाली आहे. या मार्गावर ट्रक, कंटेनरसह, दुचाकी व चारचाकी वाहनांचे अनेक अपघात झाले आहेत. अंधार आणि न दिसणारे फलक यामुळे अपघात वाढल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर रस्त्यावरील दिशादर्शक फलकांची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. जिथे फलक झाडांआड दडले आहेत, तिथे फांद्यांची छाटणी करण्याचे काम सुरू आहे. ठाणे-बेलापूर रस्त्याच्या समांतर असणाऱ्या रस्त्यांवरील झाडांच्या फांद्यांचीही छाटणी करण्यात येईल.
– तुषार पवार, उपायुक्त, उद्यान विभाग, नमुमंपा