उरण : सोमवार पासून सुरू झालेल्या पावसामुळे उरण पनवेल मार्गावरील जेएनपीटी कामगार वसाहती जवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मंगळवारी या मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे उरण वरून जाणाऱ्या व उरण मध्ये येणाऱ्या वाहनांची कोंडी होत असल्याने प्रवाशांना ही त्रास सहन करावे लागत आहे.उरण पनवेल मार्गावरील उरण शहर ते जेएनपीटी कामगार वसाहत दरम्यानच्या चार किलोमीटर अंतरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पनवेल : पाचशे जणांचे प्राण वाचविणाऱ्या त्या’ पाच देवदूतांना पनवेलकरांचा सलाम

या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या मार्गावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने वारंवार खड्डे पडत आहेत. याचा त्रास येथील नागरिकांना होत आहे. त्याचप्रमाणे या खड्ड्यामुळे वाहतूक ही मंदावत असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्याचे काम केले जात असले तरी खड्डे मात्र कायम आहेत.