नवी मुंबई : महापालिका मुख्यालयाच्या समोरील व एनआरआय पोलीस ठाण्याच्या शेजारील नेरुळ सेक्टर ५२ ए हा परिसर सीआरझेड अंतर्गत येत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खारफुटी आहे. त्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करायला हवे. परंतु असे न करता सिडकोने या परिसरात असलेली झाडे तोडल्याने संबंधित सिडको अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेविका शिर्के व पर्यावरणप्रेमींनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. शिर्के आणि पर्यावरणप्रेमींनी नाईक यांची मंत्रालयात भेट घेऊन ही मागणी केली.

नेरुळ सेक्टर ५२ ए परिसरात जवळजवळ २०० पेक्षा अधिक झाडे तोडल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आल्यानंतर याबाबत पर्यावरणप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी नेत्रा शिर्के यांच्या पुढाकाराने पर्यावरणप्रेमींनी नाईक यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. पर्यावरणप्रे सुनील तसेच श्रुती अग्रवाल तसेच वन विभाग आणि कांदळवन विभागाचे दीपक खाडे यावेळी उपस्थित होते.

नेरुळ सेक्टर ५२ अे हा परिसर सीआरझेड अंतर्गत येत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खारफुटी आणि दाट जंगल आहे. याच परिसरात डीपीएस तलाव असून या ठिकाणी फ्लेमिंगोंचा मोठ्या प्रमाणात रहिवास असतो. फ्लेमिंगोंसह दुर्मीळ सोनेरी कोल्हा तसेच मुंगूस आदी प्राण्यांचे येथे वास्तव्य आहे.

नाईक-सिडको अध्यक्ष भेट

वनमंत्री गणेश नाईक बुधवारी सिडको व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी डीपीएस तलाव ते जेट्टी परिसर वनविभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणार आहेत.

Story img Loader