लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलापाठोपाठ महानगरपालिकेत अंतर्गत बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सोमवारी उशिरा तब्बल १२० अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या काळात स्थगित केलेल्या बदल्यांचाही समावेश आहे. नवी मुंबई मनपामध्ये अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून यात वैद्याकीय, अभियांत्रिकी, ते सफाई कामगार पर्यंत बदल्या करण्यात आल्या आहेत.

दंत शल्य चिकित्सक डॉ. अजय गडदे यांच्याकडे सध्या असलेला सार्वजनिक रुग्णालय वाशी कोविड संपूर्ण कामकाज नियंत्रित करण्याचे काम आहे. त्याच्या व्यतिरिक्त अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त (मुख्यालय) म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. महसूल आणि वन विभागाच्या कक्ष अधिकारी ऋतुजा गवळी यांना नवी मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून प्रतिनियुक्तीने पाठवले आहे. त्यांना आयुक्तांनी उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

आणखी वाचा-इंग्रजी नर्सरी सुरू करण्याचा महापालिकेचा घाट, वाद निर्माण होण्याची शक्यता

तर सध्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जयंत जावडेकर यांची घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन भागातील मुख्य स्वच्छता अधिकारी हे पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त होते. या ठिकाणी अनेक स्वच्छ्ता अधिकारी या पदाच्या पदाचा कार्यभार मिळण्याकरिता स्पर्धेत होते; त्या वेळी पैकी सतिश सनदी यांची या ठिकाणी वर्णी लागली आहे.

अन्य बदल्या

करारावरील शिपाई -२३, उपअभियंता – ५, कनिष्ठ अभियंता – ७, डॉक्टर – ६, स्वच्छ्ता अधिकारी ४ , लिपिक १, वैद्याकीय समाज सेवक २, परिचारिका १, शाखा अभियंता १, सहाय्यक आयुक्त १, नवीन १, सफाई कामगार -१८, स्वच्छ्ता निरीक्षक १४, शिपाई -३५ अशा एकूण १२० अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transfer of 120 officers and employees in navi mumbai municipal corporation mrj