५० मायक्राँन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी असूनही सर्रास सर्वत्र वापरल्या जातात. विशेष म्हणजे नवी मुंबई मनापा सातत्याने कारवाई करीत असून लाखो रुपयांची दंड वसुलीही करत आहे मात्र त्यावर पूर्ण नियंत्रण मिळत नसल्याने आता तृतीयपंथीयांच्या कडून जनजागृती करण्यात येत आहे. फेरीवाली तसेच दुकानात या बाबत थेट विक्रेते आणि ग्राहकांशी संवाद साधून हे तृतीयपंथी जनजागृती करताना दिसत आहेत.
हेही वाचा- शीव पनवेल मार्गावरील एमएसआरडीसीचे ४ उड्डाणपुल नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत
२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत एका रात्रीत पडलेल्या जोरदार पावसाने मुंबईची दाणादाण उडवली होती. एक तर समुद्राला आलेली भरती आणि वरून भूतोना भविष्यती पाउस त्यामुळे मुंबई पहिल्यांदाच एवढी जलमय झाली होती यात नवीमुंबईहीही वेगळी परिस्थिती नव्हती. पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी साठले याला सर्वात महत्वाचे कारण ठरले ते प्लास्टिकचा बेसुमार वापर. नाल्यात प्लास्टिक अडकल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. एवढ्या मोठ्या संकटाला कारण असलेले प्लास्टिक तरीही वापरले जाते. नवी मुंबईत याचा मुख्य स्त्रोत हा एपीएमसी मार्केट असून तेथूनच सर्वाधिक वापर आणि विर्की केली जाते. नवी मुंबई मनपाने त्यासठी कंबर कसली असून एक दोन दिवसाआड कारवाई सुरु आहे. तरीही प्लास्टिक वापरावर नियंत्रण मिळाले नाही. त्यामुळे आता अनोखी शक्कल लढवण्यात आली असून तृतीयपंथीयाकडून जनजागृती करण्यात येत आहे.
हेही वाचा- चिरनेर परिसरात हेटवणे जलवाहिनीला गळती; नवी मुंबईतील पाणी पुरवठा बंद
सोमवारी पूर्ण एपीएमसी मार्केटमध्ये अनेक तृतीयपंथी प्लास्टिक वापरू नका असे आवाहन करीत होते. या ठिकाणी ठोक आणि किरकोळ विक्री करणारे तसेच फेरीवाल्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. अशा ठिकाणी टप्प्याटप्याने जाणार आहेत. सोमवारी मँफाको मार्केट परिसरात जनजागृती करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे आणि स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे आणि अन्य स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच यावेळी एका व्यापार्याकडे ७ किलो प्लास्टिक साठा आढळून आला हा जप्त करीत १० हजाराचा दंड ठोठावण्यात आला.