नवी मुंबई:  मुंबई नाशिक – नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक अतिशय संथ गतीने होत आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होत आहे. दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने येथील खड्डे बुजवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम वेगाने होण्यासाठी  वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. खड्डे बुजवण्याचे काम हे खारेगाव टोल नाका ते पडघा पर्यंत रस्त्यावरील खड्डे संबधित प्राधिकरणाकडून सुरु करण्यात आले आहे. हे काम तीस दिवस चालणार असून काम पुर्ण होईपर्यंत खालील प्रमाणे जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जे.एन.पी.टी./ कळंबोली, नवी मुंबई कडून तसेच दक्षिण भारतातून पुणे मार्गे तळोजाकडून कल्याण फाटा व शिळफाटा मुंब्रा बायपास मार्गे नाशिक, गुजरात, भिवंडी उत्तर भारतात जाणाऱ्या जड – अवजड वाहनांना मुंब्रा बायपास, शिळफाटयाकडे नवी मुंबई हद्दीतुन सकाळी ०५.०० ते रात्री ११ वाजेपर्यंत  या वेळेत प्रवेश बंद करण्यात येत आहे.

हेही वाचा… नवी मुंबई: मद्य पिण्यास पैसे दिले नाही म्हणून दोघांनी केली मारहाण 

जे.एन.पी.टी./ कळंबोली, नवी मुंबई उरण मार्गे सायन-पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर रोड मार्गे, महापे ब्रिज कडून शिळफाटा मार्गे, गुजरात, भिवंडी, नाशिक, उत्तर भारतात जाणाऱ्या जड – अवजड वाहनांना वरील मार्गावरुन नवी मुंबई हद्दीतुन शिळफाटा कडे येण्यास सकाळी ०५.०० ते रात्री ११ वाजेपर्यंत या वेळेत प्रवेश बंद करण्यात येत आहे.

 पर्यायी मार्ग:

गोवा बाजूकडून ठाणे मार्गे भिंवडी, नाशिक, गुजरातकडे जाणारी वाहने ही पळस्पेफाटा येथुन राष्ट्रीय महामार्ग क्र. ०४ ने कोनफाटा चौकफाटा – कर्जत-मुरबाड – सापगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग ०३ ने इच्छित स्थळी जातील.

पुणे बाजुकडुन ठाणे मार्गे, भिवंडी, नाशिक, गुजरातकडे जाणारी वाहने ही चौक फाटा – कर्जत- मुरबाड-सापगांव मार्गे इच्छीत स्थळी जातील.

जे.एन.पी.टी., उरण परिसरातून ठाणे मार्गे भिंवडी, नाशिक, गुजरात कडे जाणारी वाहने डी-पॉईंट पळस्पेफाटा, चौकफाटा, कर्जत मुरबाड मार्गे इच्छीत स्थळी जातील.

जे. एन. पी. टी. / उरण परिसरातून नाशिक व उत्तर भारतात जाणारी जड-अवजड वाहने डी पॉईंट पळस्पे फाटा येथून डावे वळण घेवून मुंबई- पुणे महामार्गाने – इच्छित स्थळी जातील. – (चाकण  मार्गे ) 

सदरची अधिसुचना अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही.