उरण : कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके या दोन्ही दिग्गजाना उरणकरांनी आदरांजली वाहिली. उरणच्या पक्वान हॉटेलमध्ये गुरुवारी उरण सामाजिक संस्था आणि उरण उत्कर्ष समितीच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,एल. बी. पाटील, उरण पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक ठाकूर, संतोष पवार,नंदकुमार साळवी यांनी श्रद्धांजली वाहिली.