मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत सप्टेंबरमध्ये डाळींची आवक घटल्याने डाळींची दरवाढ झालेली आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातुन दाखल होणाऱ्या डाळींच्या उत्पादनाला पावसाचा फटका बसला आहे . त्यामुळे एपीएमसीत ३०% ते ४०% आवक घटली आहे. परिणामी डाळींची दरवाढ झाली असून तूरडाळ आणि मुगडाळीने घाऊक बाजारात शंभरी गाठली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- रुग्णालय व मेडिकलसाठी सवलतीच्या दरात भूखंड द्या; नगरविकास विभागाचे सिडकोला आदेश

पावसामुळे उत्पादनाला फटका

ऑगस्टमध्ये एपीएमसी बाजारात डाळींची २५ हजार क्विंटलहुन अधिक आवक झाली होती ती सप्टेंबरमध्ये ५ हजार ते २०हजार क्विंटलवर आली आहे. ऑगस्ट सुरुवातीच्या महिन्याला गणेशोत्सवामुळे बाजारात आवक रोडावली होती. त्याचबरोबर आता मागील काही दिवसांपासून राज्यसह इतर राज्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे . या पावसाच्या संततधारेचा फटका डाळींच्या उत्पादनालाही बसला आहे. एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होतात, परंतु राज्यातून आणि गुजरात मधून मोठ्या प्रमाणावर डाळींची आवक होते. मात्र पावसामुळे उत्पादनाला फटका बसला असून बाजारात डाळींची आवक ३०% ते ४०% घटली आहे. तूरडाळीची आवक निम्म्याहुन कमी झाली आहे. ऑगस्टमध्ये बाजारात ६५ हजार १९४ क्विंटल दाखल झाली होती. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत २२हजार ५२८ क्विंटलची नोंद झाली आहे. त्यामुळे दरात प्रतिकिलो ५ ते २५रुपयांनी वाढ झाली आहे. मुगडाळ ऑगस्टमध्ये २५३४१ क्विंटल तर आता ११३०८ क्विंटल आवक झाली आहे.

हेही वाचा- डॉ. मनीष पाटील यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच; सिडको आणि प्रशासन यांच्यातील बैठक अनिर्णित

किरकोळ बाजारात डाळींची शंभरी पार

घाऊक बाजारात डाळींची दरवाढ झाली की त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावरही पहावयास मिळतो. परंतु किरकोळ बाजारात चढ्या दराने डाळींचे विक्री होत असते. किरकोळ बाजारात मुख्यत्वे नित्याने वापरात असलेल्या डाळींनी प्रतिकिलो शंभरी पार केलेली आहे. तूरडाळ ११०रु ते १२०रु, मुगडाळ १००रु ते १२०रु, उडीद डाळ १२०रु, मसूर डाळ ११०रु आणि चणाडाळ ८०रु ते ११० रुपयांवर गेली आहे.

घाऊक बाजारात डाळींची दरवाढ

एपीएमसीत पावसामुळे डाळींची आवक ३०% ते ४०%कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींची दरवाढ झाली असल्याची माहिती
एपीएमसी बाजारातील घाऊक व्यापारी हर्षद देढिया यांनी दिली.

हेही वाचा- भाज्या कडाडल्या! ; पावसाच्या तडाख्याने पिकहानी : कोथिंबीर जुडी शंभरीपार

आवक क्विंटलमध्ये
डाळी ऑगस्ट २०२२ दर १५ सप्टेंबर २०२२ दर
चनाडाळ २५७७६ ६० ४८५९ ६२
मसुरडाळ १२९६१ ८४ ७४५१ ७८
मूगडाळ २५३४१ १०० ११३०८ १००
तूरडाळ ६५१९४ ९५ २२५२८ १००-१२०
उडीद डाळ १७१४९ ९० ८००४ ९५
वाटाणा डाळ १९९६ ६० १९५८ ६२

किरकोळ दर
तूरडाळ ११०-१२०रु
मुगडाळ १००-१२०रु
उडीद डाळ – १२०रु
मसूर डाळ ११०रु
चणाडाळ ८०-११० रु

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tur mugdali reached a hundred in the wholesale market in september dpj