उरण : चिरनेर मध्ये बुधवारी ५० किलो वजनाचा तब्बल साडेबारा फूट लांबीचा भला मोठा अजगर आढळला आहे. बुधवारी रात्री चिरनेरच्या अक्कादेवी जंगल परिसरातील आदिवासी पाड्यातील एका घराच्या मागच्या बाजूला हा अजगर आढळला. याची माहिती फ्रेड्स ऑफ नेचर या निसर्गप्रेमी संस्थेचे राजेश पाटील यांना येथील आदिवासीनी दिली. त्यानंतर त्यांनी जाऊन या अजगराला सुरक्षित पकडून त्याला चिरनेर मधील जंगलात सोडण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा