पनवेल :  पनवेल तालुक्यातील ग्रामीण परिसरामध्ये नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना प्राधिकरण जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात वाहनांची येजा करण्यासाठी रुंद रस्ते नसल्याने अपघातांचे सत्र सूरुच आहे. मागील दोन दिवसांमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका महिलेचा मृत्यू तर तीनजण जखमी झाल्याची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहेत.  नैना प्राधिकऱण क्षेत्रात अद्याप रस्त्यासारखी पायाभूत सुविधांची कामे सिडको मंडळाने हाती घेतली नाही. त्यामुळे रस्त्यांवर अपघात होणे हे नित्याचे झाले आहे.

हेही वाचा >>> Maharashtra 12th HSC Results 2024: पनवेल तालुक्यातील ९७.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Shocking video A car drags a cow calf walking across the road for 200 meters watch what happened next
सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Accident News :
Accident News : कंटेनर कारवर पलटी होऊन भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
Private bus accident at Tamhani Ghat 5 dead and 27 injured
ताम्हणी घाटात खाजगी बस अपघात; ५ जण ठार, २७ जखमी
PMP bus pune, PMP bus accident risk,
पुणेकर सावधान! रस्त्यांवरून धावताय मृत्यूचे सापळे, प्रवाशांचा जीव धोक्यात?
In last two days three accidents on the highway at Uran JNPA and Panvel
उरण, पनवेल जेएनपीए परिसरात कंटेनर अपघातांची मालिका
One killed three injured in Samriddhi Expressway accident after speeding car burst tyres
बुलढाणा : शेगाव दर्शनाची मनोकामना अधुरी! ‘समृद्धी’वर वाहनाचे टायर फुटले; एक ठार, तीन जखमी

अरुंद रस्त्यांमुळे वाहनांची ठोकर होणे आणि अपघातांमुळे भांडणाचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता हरिग्राम ते केवाळे या गावादरम्यान एका रिक्षाच्या अपघातामध्ये एक महिलेचा मृत्यू झाला तर दोनजणी जखमी झाल्या. रिटघर गावातील नागूबाई भगत या घरी परतत असताना अपघातामध्ये त्यांनी जीव गमावला. या अपघातामध्ये रिक्षाचालकाने एका भिंतीला ठोकल्याने हा अपघात घडला. रिक्षातील प्रवासी दूंदरे गावातील जयश्री माळी व केवाळे गावातील आनंती नागुडांगरकर या सुद्धा जखमी झाल्या. तसेच दूस-या घटनेत सोमवारी दुपारी पावणेचार वाजता हरिग्राम गावालगत साई एकविरा धाब्यासमोर खानाव येथे राहणारे शूभम व आदित्य पाटील हे दोघे दुचाकीवरुन प्रवास करत असताना भरधाव इरटीगा मोटारीने दुचाकीच्या उजव्या बाजूला धडक दिली. या अपघातामध्ये शुभमच्या पायाला जबर मार लागला. सध्या ग्रामीण पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने येथील पायाभूत सुविधा सिडको मंडळाने तातडीने उभाराव्यात अशी मागणी गावक-यांकडून होत आहे.

Story img Loader