जेएनपीए बंदरातून निर्यातीसाठी आलेल्या मालात लपवून रक्तचनांदनाची तस्करी होत असल्याची माहिती जेएनपीटी सीमा शुल्क विभागाला मिळाल्याने त्यांनी केलेल्या कारवाईत कंटेनर मधून तस्करी होत असलेले अडीच कोटी रुपये किंमतीचे ३ हजार ३० किलो वजनाचे रक्तचंदन डी आर आय या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत जप्त केले आहे.
या रक्तचनांदनाच्या तस्करीची अधिक चौकशी सुरू आहे. अशा प्रकारे मागील ३२ वर्षांपासून बंदरातून लाखो किलो रक्तचंदन यापूर्वी जप्त करण्यात आले आहे.