नवी मुंबई : नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियम ‘कोल्डप्ले’ या जागतिक दर्जाच्या संगीत कार्यक्रमाचे १८, १९ आणि २१ जानेवारीला करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी दिवसाला सुमारे ७५ हजार म्हणजेच तीन दिवसांत सव्वादोन लाख श्रोते उपस्थित राहतील. त्यामुळे नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी चोख नियोजन केल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असली तरी शहरांतर्गत तसेच शीव-पनवेल मार्गावरील नियमित वाहतुकीला कुठेही अडथळा होऊ नये, याची दक्षता घेण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे आणि वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी ‘कोल्डप्ले’निमित्त पोलीस आणि वाहतूक नियोजनाबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाच्या तीनही दिवस एक पोलीस उपायुक्त, ७० पोलीस अधिकारी, ४३४ पोलीस कर्मचारी तैनात असतील. वाहतूक पोलीस उपायुक्त, २१ पोलीस अधिकारी, ४४० पोलीस कर्मचारी याशिवाय आयोजकांचे ४०० वार्ड असा बंदोबस्त असेल.

हेही वाचा >>>शिरसाट यांच्या फक्त घोषणाच! सिडको अध्यक्षपदावरील निर्णयांबाबत उलटसुलट चर्चा

याशिवाय आपत्कालीन स्थितीत वैद्याकीय सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे जवान तैनात असतील. अनधिकृत पार्किंग किंवा गाडी बंद पडणे असे प्रकार घडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी १७ टोईंग क्रेन वाहनांची सोय करण्यात आली आहे. अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस व ११२ या पोलीस मदत कमांकावर माहिती कळवावी असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे. बनावट तिकीट ‘अॅप’वर तातडीने कळते. त्यामुळे बनावट वा ब्लॅक तिकीटापासून दूर राहावे, असे ‘बुक माय शो लाईव्ह’चे ओव्हन रॉनकॉन यांनी स्पष्ट केले.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती काळजी घेतली आहे. कार्यक्रमस्थळी नऊ प्रवेशद्वार आहेत त्या प्रत्येक ठिकाणी स्निफर डॉग (अमली पदार्थ ओळखणारे श्वान ) तैनात असणार आहेत. बनावट तिकिटांबाबत खात्री अॅपद्वारे करता येते त्यामुळे असे तिकीट घेऊन कोणी आले तर कारवाई केली जाईल. तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर नजर असणार आहे.- पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून काळजी घेतली आहे. नो पार्किंग, प्रवेश बंदी घोषित केलेली आहे. असे असले तरी त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात येईल. त्यांच्या गाड्यांना विनाअडथळा सोडण्यात येणार आहे. नियमित वाहतुकीस कुठलाही अडथळा होणार नाही याची काळजी घेतली आहे. – तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त वाहतूक

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two and a half lakh clod paly music event listeners in three days navi mumbai news amy