उरण : वादळीवाऱ्यामुळे रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास करंजा रो रो जेट्टीवर अरबी समुद्रातून जाणारी दोन मालवाहू जहाजे धडकली. त्यामुळे दोन जहाजे अडकून पडली आहेत. याची माहीती येथील स्थानिक मच्छिमार नेत्यांनी देऊनही उरणचे आपत्ती व्यवस्थापन किंवा यंत्रणा तासभर फिरकली नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात उभारण्यात आलेली अपत्तीव्यवस्थापन यंत्रणा बेपत्ता दिसत होती.

अलिबाग,पेण व कोकणातील बंदरात जाणारी अनेक मालवाहू जहाजे ही करंजा परिसरातून ये जा करीत आहेत. मात्र मागील तीन दिवसांपासून चक्रीवादळ किनाऱ्यावर घोंगावत असल्याने सोसाट्याचा वारा वाहत आहे. या वाऱ्याच्या वेगामुळे समुद्रातून जाणारी दोन मालवाहू व या जहाजांना दिशादर्शक असलेले टग ही किनाऱ्यावर धडकली असल्याची माहीती रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मच्छिमार नेते सीताराम नाखवा यांनी दिली.

Story img Loader