ऐरोलीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी मढवी पिता-पुत्राला अटक केली आहे. एक मार्च रोजी नवी मुंबई मनपाच्या इमारत उद्धाटनप्रसंगी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गदारोळ झाला होता. आमदार संदीप नाईक आणि अन्य राष्ट्रवादी कार्यकर्त्याविरुद्ध स्थानिक शिवसेना नगरसेवक करणं मढवी आणि त्यांचे वडील एम के मढवी यांच्यात हा राडा झाला होता. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी मढवी पिता-पुत्राला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येतेय

एक मार्च रोजी ऐरोली सेक्टर 5 येथे कै. जानकीबाई कृष्णा मढवी बहू उद्देशीय इमारत उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मारामारी झाली होती. या वेळी मुख्य अतिथीपैकी असलेले खासदार राजन विचारे येईपर्यंत वाट पाहू अशी विनंती आमदार संदीप नाईक केली होती. हे उद्धाटन महापौर जे डी सुतार यांनी केले. याच मुद्द्यांवर नगरसेवक एम के मढवी आणि महापौर सुतार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली याच वेळेस दोन्ही कडील कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

या राड्यात कात्री व लोखंडी रॉड घेऊन गाडीची काच फोडल्याचा आरोप करत आमदार नाईक यांनी राबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. या हाणामारी व तक्रारीचा तपास करून जमावाला भडकवल्या प्रकरणी नगरसेवक मढवी पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. मढवी पिता-पुत्राला अटक केल्याच्या वृत्ताला परिमंडळ एकचे उपयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दुजोरा दिला आहे.

Story img Loader