नवी मुंबई : समाजाच्या नजरेतून नेहेमीच उपेक्षित ठरलेल्या ट्रान्सजेंडर अर्थात उभयलिंगी वर्गाने नवी मुंबईत एक आदर्श पायंडा घालून देण्याचे ठरविले आहे. शहरातील प्रत्येक मोक्याच्या सिग्नल वर वाहनांच्या काचा खाली करण्यास भाग पाडून वर्गणी मागणारे हात स्वच्छ भारत अभियानाच्या इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत नवी मुंबई पालिका आणि लेट्स फिटनेस सेलिब्रेटच्या संयुक्त विद्यमाने वाशीतील सर्वात सुंदर खाडीकिनारा असलेला वाशी सी सोअर एक दिवस स्वच्छ करणार आहेत. वाशी जवळ असलेल्या कोपरी गावात या ट्रान्सजेंडर यांची एक मोठी वसाहत असून या ठिकाणी शेकडो ट्रान्सजेंडर राहत आहेत. त्यातील २०० ते २२५ ट्रान्सजेंडर या आठवड्यात झाडू हातात घेऊन हा किनारा साफ करणार आहेत. ही स्वछता मोहीम राबवून हा घटक हम भी कुछ कम नही चा संदेश सर्वसामान्य नागरिकांना देणार आहे. समाजा पासून नेहेमीच दुर्लक्षित आणि उपेक्षित असणाऱ्या या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचा पालिकेचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
दोनशे ट्रान्सजेंडर करणार वाशी सी सोअर ची स्वछता
समाजाच्या नजरेतून नेहेमीच उपेक्षित ठरलेल्या ट्रान्सजेंडर अर्थात उभयलिंगी वर्गाने नवी मुंबईत एक आदर्श पायंडा घालून देण्याचे ठरविले आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 13-09-2022 at 16:03 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two hundred transgenders will clean vashi sea soar beautiful clean ysh