नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ येथे बुधवारी रात्री आठ  वाजता चार मजली इमारतीतील एका विंगचा स्लॅब खालील दोन मजल्यावर कोसळून एक महिला व एक पुरुष ठार झाले. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना डॉ. डी वाय  पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेरूळ येथे सेक्टर ६ येथील तुलसी भवन इमारत आहे. या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर लादी लावण्याचे काम सुरू होते.  अचानक तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने खालील दोन स्लॅब देखील कोसळले. यात एका २ जणांचा मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले. ही घटना कळताच आयुक्त राजेश नार्वेकर, मुख्य अभियंता संजय देसाई , प्रमुख बाबासाहेब राजळे यांनी धाव घेतली. अग्निशमन दलाने तातडीने डेब्रिज हटवण्यात सुरुवात करत जखमींना रूग्णालयात दाखल केले आहे.