पनवेल: पाच दिवसांपूर्वी कामोठे वसाहतीमधील सेक्टर १८ येथील रस्त्यावर सोनसाखळी चोराने फळे खरेदी करुन पतीच्या दुचाकीवर बसणा-या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. चोरीस गेलेल्या दोनही मंगळसूत्रांची किंमत चार लाख रुपयांची असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने नोंदविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पळस्पे येथील कोळखेपेठ या गावात राहणा-या महिलेसोबत ७ डिसेंबरला ही घटना कामोठे येथे दुपारी साडेतीन वाजता घडली. संबंधित महिला यांचे मामा कामोठे वसाहतीमधील सेक्टर १७ येथील गणपत निवास या इमारतीमध्ये राहतात. मामाच्या मुलावर शस्त्रक्रीया झाल्याने त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या महिला पतीसोबत दुचाकीवर आली होती.

हेही वाचा… कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शौचालय घोटाळा प्रकरणी आणखी एकास अटक 

फळे खरेदी केल्यानंतर त्या सेक्टर १८ येथील रस्त्यावर दुचाकीवर बसत असताना दुचाकीवरुन आलेल्या हेल्मेटधारी चोरट्याने जोरदार हिसका देऊन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तेथून पळून गेला. कामोठे पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two mangalsutras was snatched from the neck of the woman sitting on the bike in panvel dvr