पनवेल : नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी नवी मुंबई महापालिका लवकरच दोन फिरते दवाखाने कार्यान्वित करणार आहे. यासाठी ४० लाख रुपये खर्च करून दोन वाहने खरेदी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या दवाखान्यांमध्ये डॉक्टर, परिचारिका, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तज्ज्ञ, आरोग्यसेवक असे आरोग्य कर्मचारी असतील. महापालिका क्षेत्रातील दवाखाने नसलेल्या गावांसाठी सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
हेही वाचा >>> ८०० कोटी मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य; महापालिकेच्या तिजोरीत ९ महिन्यांत ४६६ कोटी जमा
पनवेल महापालिकेने पनवेलकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी महापालिका क्षेत्रात १५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ९ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे सुरू करण्याचे धोरण आखले आहे. यापैकी ९० टक्के आरोग्य सुविधा महापालिकेने सुरू केल्या आहेत. शहरी भागातील नागरिकांबरोबरच महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील २९ गावांमधील नागरिकांना आता आरोग्य सुविधा महापालिका पुरविणार आहे.
पनवेल महापालिकेचे वैद्याकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका क्षेत्रात पुढील महिन्यात फिरते दवाखाने सुरू होण्याची शक्यता आहे. महापालिकेने यासाठी गुरुवारी निविदा काढली.
रक्त नमुने घेण्याचीही सोय… फिरत्या दवाखान्यांत रक्त व लघवी तपासणारी यंत्रणा आणि विविध साथरोगांबाबत तपासणी करण्यासाठी रक्त नमुने घेण्याची आणि ते तात्पुरत्या वेळेसाठी शीतगृहात ठेवण्याची सोय असणार आहे. एका वाहनात १० ते १२ लाख रुपये खर्च करून हा दवाखाना सज्ज करण्यात येणार आहे.