तळोजा हद्दीमध्ये अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या परदेशी नागरिकाविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. या प्रकरणी दोन नायझेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.
हेही वाचा- कोणतीही करवाढ नसलेला नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
नोसोन इगोईजे (NOSON IGHOEIE), वय ३८ वर्षे, रा. तळोजा, नवी मुंबई, मुळ रा. नायजेरीया देश असे चिबुके थाडडेयस इम्वे (CHIBUIKE THADDEUS IGWE) वय ३५ वर्षे रा. तळोजा, असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नवं वर्षांच्या पूर्व संध्येलाही अशाच कारवाईत तब्बल १६ विदेशी नागरिकांना अटक करण्यात आले होते त्यात १४ नागरिक हे नायझेरियातील होते.
हेही वाचा- नवी मुंबई : शैक्षणिक वर्ष अखेरपर्यंतही शिक्षक नाहीच, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ
अंमली पदार्थ विरोधी कक्षास अंमली पदार्थ विक्रीबाबत दोन नायजेरियन इसम एमडी हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याबाबत खबर मिळाली त्या अनुशंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासीत अली सय्यद, पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगे, एएसआय सलीम इनामदार, पोलीस हवालदार रमेश तायडे, कासम पिरजादे, संतोष गायकवाड, राकेश अहिरे, पोलीस नाईक महेंद्र अहिरे यापथकाने पेंधर मेट्रो रेल्वे स्टेशनचे पश्चिमेकडील मेट्रो रेल्वे ट्रॅक ब्रिजचे खाली चौकात पेंधर तळोजा येथे छापा टाकला.
हेही वाचा- नवी मुंबई: नागरी आरोग्य केंद्राअभावी कोपरीतील रहिवाशांना बसतोय आर्थिक भुर्दंड
यात दोन नायजेनियन नागरिक नामे नोसोन इगोईजे चिबुके थाडडेयस इम्वे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता “मेथाक्युलॉन” हा अंमली पदार्थ विक्री करिता सोबत बाळगलेल्या स्थितीत असताना मिळून आला. त्याचे मूल्य ५ लाख असून वजन ५० ग्रॅम आहे. मेथाक्युलॉन हा अंमली पदार्थ तसेच रोख रक्कम, मोबाईल असा एकुण ५ लाख २२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला किंमतीचा माल मिळुन आला. सदर गुन्हयाचा तपास वपोनि बासीतअली सय्यद हे करित आहेत.