उरण: मंगळवार हा उरणसाठी ठरला अपघात वार ठरला. दिघोडे मार्गावर कंटेनर वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. अवजड कंटेनर अपघातातील बळींची संख्या वाढू लागली. ग्रामस्थांचा उद्रेक दिघोडे नाक्यावर रस्ता रोको करीत निषेध नोंदवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी सकाळी दिघोडे गावाजवळ कंटनेर वाहनाने मधुकर घरत तर सायंकाळी उमेश ठाकूर या दोघांना भरधाव कंटेनर वाहनाने चिरडल्याने या दोघांचा मृत्यु झाला आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी बेदरकार व नियमबाह्य कंटेनर वाहन चालकांच्या विरोधात आक्रोश करीत अपघाताच्या विरोधात निषेध करीत रास्ता रोको केला. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी यावेळी हस्तक्षेप करीत ग्रामस्थांना शांत केले. उरण तालुक्यातील अनेक गावे ही कंटेनर गोदामांची व्यापली आहेत. त्यामुळे सर्वत्र अवजड कंटेनर वाहने ये जा करीत आहेत. या बेदरकार आणि नियमबाह्य कंटेनर वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात वाढले आहेत. दिघोडे मार्गावर दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला व अपघाताचा सामना करावा लागत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत.

हेही वाचा… नवी मुंबई: अपहरणाचे एकाच दिवशी तब्बल सात गुन्हे दाखल; पाचची उकल, दोन प्रकरणात तपास सुरू…

यापूर्वी ही उरण मध्ये कंटनेर वाहनांच्या धडकेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशाच प्रकारे सकाळी रस्त्यावरून जात असताना एका मध्यम वयीन नागरिक जात असताना हा अपघात झाला. या अपघातात या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी जमाव केला होता. त्यानंतर सायंकाळी एका तरुणाला वेश्वि दिघोडे मार्गावर कंटेनर वाहनांने चिरडले. पोलीसांनी याची दखल घेत परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती न्हावा शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people died in collision between container vehicles on dighode road uran dvr