या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकाने नियम मोडला; दुसऱ्याला दंड

ऑनलाइन अ‍ॅपवर वाहन क्रमांक टाकत पडताळणी केली असता त्या क्रमांकाची दोन वाहने असल्याचा प्रकार समोर आला. धक्कादायक म्हणजे दुसऱ्या वाहनाने वाहतूक नियम मोडल्याचा दंड तक्रारदार महिलेला लावला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या या कारभाराचा फटका वाशीतील एका महिला वाहकाला बसला आहे.

वाशी सेक्टर १४ मध्ये राहणाऱ्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्याकडे एक्टिव्हा ही दुचाकी आहे. त्यांनी ९ एप्रिल २०१९ रोजी वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तिची नोंदणी केली. त्यांच्या गाडीला एम एच ४३: बी एस २४५१ असा क्रमांक देण्यात आला आहे.

१६ डिसेंबर रोजी जयश्री यांचा भाऊ विनोद देशमुख याने हा क्रमांक ऑनलाइन तपासणी केली असता, त्यांना या एकाच क्रमांकाची दोन वाहने दिसली. तसेच या क्रमांकाच्या वाहनावर परवाना नसल्याबाबत २०० रुपये दंड भरण्याचे सूचित केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विनोद यांनी अधिक माहिती घेतली. ज्या गाडीला दंड आकाराला आहे, त्या गाडीचा फोटो पाहिला असता, एम एच ४३ : बी एस २४५१ हाच क्रमांक दिसला, मात्र गाडी मात्र दुसरी होती. सदर वाहन हे प्रतीक अंभोरे यांचे असल्याचे समोर आले आहे. याबाबत जयश्री पाटील यांनी वाशी पोलीस ठाण्यात तसे पत्र दिले असून उपप्रादेशिक परिवहन विभागालाही कळविले आहे.

याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. नेमका प्रकार काय घडला याबाबत शहानिशा करण्यात येत आहे. नजरचुकीने अथवा तांत्रिक चुकीने हा प्रकार घडला असावा. याबाबत उचित कारवाई करण्यात येईल. – दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी